Water Supply Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply Scheme : पाण्याच्या गुणवत्तेसाठी ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान

जिल्ह्यातील नळपाणी पुरवठा योजनेच्या अस्तित्वातील सर्व स्रोतांचे जिओ टॅगिंग पाणी गुणवत्ता परीक्षण तसेच (एफटीकेद्वारे) तपासणी व त्याबाबतचे प्रशिक्षण घेण्यासाठी एक डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान स्वच्छ जल से सुरक्षा अभियान राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

Team Agrowon

सोलापूर ः जिल्ह्यातील नळपाणी पुरवठा योजनेच्या (Water Supply Scheme) अस्तित्वातील सर्व स्रोतांचे जिओ टॅगिंग पाणी गुणवत्ता परीक्षण तसेच (एफटीकेद्वारे) तपासणी व त्याबाबतचे प्रशिक्षण घेण्यासाठी एक डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान स्वच्छ जल से सुरक्षा अभियान राबविले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

जलजीवन मिशनअंतर्गत केंद्र शासनाच्या जल जीवन सर्वेक्षण २०२३ चा भाग असणारे हे अभियान आहे या अभियानांतर्गत हर घर जल या मोबाईल ॲपद्वारे अस्तित्वातील सर्व पाणीपुरवठा योजना, रेट्रो फिटिंगमधील पाणीपुरवठा योजना व नवीन योजनेतील स्रोतांची जिओ टॅगिंग पूर्ण करणे, सर्व स्रोतांची मॉन्सून पश्‍चात कालावधीमधील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे.

तसेच सर्व पाणी नमुने जल सुरक्षका मार्फत गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी एफटीकेद्वारे कशा पद्धतीने पाण्याची तपासणी करावी, याबाबत गावातील पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात येऊन केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर त्यांची नावे अपलोड करण्यात येणार आहेत, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी म्हणाले.

कामासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी

स्वच्छ जल से सुरक्षा या अभियानात वरिष्ठ वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी सर्व पाणी नमुन्याची तपासणी करावी, रेट्रो फिटिंग, नवीन योजनातील स्रोतांची जिओ टॅगिंग ग्रामीण पाणीपुरवठ्याचे शाखा अभियंता हे करणार आहेत. त्यासाठी कामांच्या जबाबदारीचे वाटपही केले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT