Sugarcane Strike Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ‘स्वाभिमानी’ने ‘जरंडेश्‍वर’चा ऊस चार तास रोखला

Sugarcane Farmers Strike : जरंडेश्‍वर शुगर मिलने मागील वर्षी गाळलेल्या उसाचे प्रतिटन ४०० रुपये द्यावेत, चालू गळीत हंगामात प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याची ऊस वाहतूक सुमारे चार तास रोखून धरली.

Team Agrowon

Satara News : जरंडेश्‍वर शुगर मिलने मागील वर्षी गाळलेल्या उसाचे प्रतिटन ४०० रुपये द्यावेत, चालू गळीत हंगामात प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (ता. २३) कारखान्याची ऊस वाहतूक सुमारे चार तास रोखून धरली.

‘जरंडेश्‍वर’च्या अधिकाऱ्यांनी गतवर्षीसारखा यंदा चांगला दर महिनाअखेर जाहीर करण्याची ग्वाही दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र संघटना २८ नोव्हेंबरपर्यंत दराची घोषणा व्हावी या मागणीवर कायम होती.

‘स्वाभिमानी’ने चिमणगाव गोट्यावर (ता. कोरेगाव) येथे कोरेगाव - पुसेगाव रस्त्यापासून ‘जरंडेश्‍वर’कडे जाणारी ऊस वाहतूक रोखून धरली. त्यातून बैलगाडी ऊस वाहतुकीस सूट दिली. मात्र ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रॅक्टर मुंगळे (छोटी ट्रॉली) रोखले. ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य प्रवक्ते अनिल पवार, कोरेगावचे तालुकाध्यक्ष जीवन शिर्के आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

आंदोलनादरम्यान, पोलिस व आंदोलकांत शाब्दिक चकमकी झाल्या. मिलचे शेती अधिकारी चंद्रकांत थोपटे, ऊसपुरवठा अधिकारी प्रमोद कणसे, शेती विभाग अधिकारी शिवाजी कोरे, मिल सचिव संदीप सावंत, ऊस विकास अधिकारी हिंदुराव चव्हाण आंदोलनस्थळी आले. त्यांनी मागण्या वरिष्ठांकडे मांडण्याची ग्वाही आंदोलकांना दिली.

‘‘आम्ही आताच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आहोत. गतवर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘जरंडेश्‍वर’ चांगला दर देईल. हा दर महिनाअखेर जाहीर करू,’’ अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT