Sugarcane FRP Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP Rate : ऊस परिषदेपूर्वी कारखाने सुरू करून दाखवाच, 'स्वाभिमानी'चा कारखान्यादारांना इशारा

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानीच्या ऊस परिषदेनंतरच गतवर्षीचे चारशे आणि तुटणाऱ्या उसाला एफआरपीपेक्षा जादा किती हे जाहीर करूनच हंगामाची तयारी करावी.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugar Factory : कोल्हापूर जिल्ह्यातील काही साखर कारखाने तुटणाऱ्या उसाला प्रतिटन ३००१ रुपये दर जाहीर करून १ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मात्र स्वाभिमानीच्या ऊस परिषदेनंतरच गतवर्षीचे चारशे आणि तुटणाऱ्या उसाला एफआरपीपेक्षा जादा किती हे जाहीर करूनच हंगामाची तयारी करावी.

१ नोव्हेंबरपासून कारखानदारांनी ऊस तोडून दाखवावाच असे खुले आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सोमवारी (ता.३०) जयसिंगपूर येथील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीत कारखानदारांना दिले.

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील आणि माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक म्हणाले, गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन चारशे रुपये साखर कारखान्यांना देणे शक्य आहे. साखरेच्या वाढलेल्या दराच्या अनुषंगाने स्वाभिमानीकडून अभ्यासपूर्ण मागणी करण्यात आली आहे. यामध्ये काहीही अवास्तव नाही.

शिवाय यावर्षी पावसाअभावी जिरायत शेतीतील ऊस पिक वाया गेले आहे. महापुराच्या धास्तीने नदीकाठच्या शेतीतील उसाची बियाणे आणि चाऱ्यासाठी विक्री झाली आहे. पावसाअभावी ऊस पिकाची वाढ झाली नाही. यावर्षी उसाची टंचाई कारखान्यांना जाणवणार आहे. कारखान्यांकडून उसाची पळवा पळवी केली जाणार आहे.

अशा स्थितीत उसाला जादा भाव मिळणे अपेक्षित असताना दांडगावा करून कारखाने सुरू करण्याचे धाडस कारखानदारांनी केल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. शेतकऱ्यांनीदेखील उसाला जादा भाव मिळण्यासाठी संयम राखण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत जयसिंगपूर येथे ७ नोव्हेंबरला होणाऱ्या २२ व्या ऊस परिषदेतच दर निश्चित करून तो कारखानदारांकडून वसूल केला जाईल. यावर्षी कारखाने जास्त काळ चालणार नाहीत. कारखानदारांनी संघटनेला सहकार्य करून संघर्षाची भूमिका टाळावी असे आवाहन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष शैलेश आडके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राम शिंदे, स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे, भरत बँकेचे अध्यक्ष पै. विठ्ठल मोरे, सुभाष शेट्टी, हातकणंगले तालुकाध्यक्ष आप्पा एडके, सुरेश पाटील, सागर मादनाईक उपस्थित होते.

तर २ नोव्हेंबरला मोटारसायकल रॅली

१ नोव्हेंबर रोजी कारखाने सुरू करण्याची भूमिका घेतली तर २ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शिरोळ, हातकणंगले तालुक्यात मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले जाईल. यात शेतकऱ्यांना प्रबोधन करत कारखानदारांचे ऊसतोडीचे मनसुबे उधळून लावू असा इशारा, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष शैलेश आडके यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan Renewal: परभणीत पीककर्ज नूतनीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल कमी

Rural Water Supply: मुरबाड ग्रामीण भाग टँकरमुक्तीच्या दिशेने

Agriculture Conference: माटुंग्यात हवामान बदल, कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया परिषद

Sunflower Farming: सूर्यफूल पिकाच्या शेतीने समृद्धीकडे वाटचाल

Fort Conservation: नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यासाठी सव्वासात कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT