swabhimani shetkari Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : कापूस-सोयाबीन दरासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक; सरकारचा केला प्रतीकात्मक दशक्रिया विधी!

Cotton-soyabean Rate : कापूस-सोयाबीन दर पडले असताना महायुती सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आक्रमक आंदोलन करण्यात आले.

Swapnil Shinde

Buldhana News : यंदा पावसाने ओढल्याने खरीप हंगामातील पिकांचे उत्पादनात घट झाली. सध्या राज्य सर्वत्र पिकांची काढणी आहे. सणासुदीच्या तोंडावर बाजारात शेतमालाची आवक वाढली असून सोयाबीन आणि कापूस दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. खामगाव येथे शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध करून प्रतीकात्मक दशक्रिया विधी केला.

सोयाबीन प्रति क्विंटल ८ हजार रूपये व कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रूपये भाव देण्यासाठी मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. त्यांच्या आंदोलनास राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहेत. तरी देखील सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने खामगावामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या फोटोंना हार घालून सरकारचा प्रतिकात्मकरित्या दशक्रिया विधी पार पाडला.

सरकारने हस्तक्षेप करून कापूस व सोयाबीनला चांगले भाव द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिवाळीच्या दिवशी राज्य सरकारचा तेरव्या पत्रिका वाटून आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष अमोल टिकार-पाटील देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT