Soil Erosion Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Erosion : जमिनीची धूप थांबविली तरच भविष्यात शाश्‍वत उत्पादन

Soil Health : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत मृदेची धूप, पोषकता व मृदा संवर्धन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Ahilyanagar News : जमिनीतील मातीची धूप कमी करणे, पाणी व्यवस्थापन करणे यासारखे उपाय योजून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी लक्ष दिले तरच भविष्यात जमीन शाश्‍वत उत्पन्न देईल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत मृदेची धूप, पोषकता व मृदा संवर्धन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. पाटील बोलत होते.

या वेळी प्रमुख व्याख्याते म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषदेतील मृदा व जलसंवर्धन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजीवकुमार सिंग उपस्थित होते. संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा कुलसचिव तथा सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे व पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. राजीवकुमारी सिंग यांनी सद्यःस्थितीतील भारताच्या जमीन वापराच्या पद्धतीतील बदल, जमिनीचा ऱ्हास आणि पोषकता, पाणलोट स्थितीतील बदल, पाणलोट विकासाचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. मृद व जलसंधारणाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. व्ही. एन. बारई यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT