Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण; मदत कधी?

पाच महिने झाले तरी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे मदत कधी मिळणार, असा सवाल जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत.

Team Agrowon

Sangli Crop Damage Panchanama : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. बाधित पिकांचे पंचनामे संबंधित विभागाने पूर्ण केले असून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे.

आता पाच महिने झाले तरी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप मदत (Help) मिळाली नाही. त्यामुळे मदत कधी मिळणार, असा सवाल जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत.

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. पावसामुळे वाळवा, पलूस, कडेगाव, आटपाडी, जत, कवठे महांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज या नऊ तालुक्यांतील पिकांचे नुकसान झाले.

या तालुक्यांतील ४५ हजार ८६८ शेतकऱ्यांचे २१ हजार ८८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सर्व पंचनामे पूर्ण झाले.

संबंधित विभागाने पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. २१ हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसाठी शासनाच्या मदतीच्या आदेशानुसार ४२ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली आहे;

मात्र, पाच महिन्यांचा कालावधी झाला असून मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. लोकप्रतिनिधींनी याकडेही दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.

वास्तविक पंचनामे वेळेत झाले, संबंधित विभागाने अहवाल तयार करून वरिष्ठ विभागाकडे पाठवण्यात आला आहे; मात्र, आता मदत कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे;

मात्र, जिल्हा प्रशासनाने भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

ऑक्टोबरमध्ये पावसामुळे पीक नुकसानीची स्थिती

शेतकरी - संख्या क्षेत्र (हेक्टर) - रक्कम

जिरायत पिके

२८४९४ - १४२७९.६२ - १९ कोटी ४२ लाख

बागायत पिके

११९४६ - ५०७४.४९ - १३ कोटी ७१ लाख

फळ पिके

५४२८ - २५३३.२४ - ९ कोटी ११ लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT