Crop Damage Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी

Unseasonal Rain : राज्यात मागील तीन-चार दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गारपिटीने द्राक्ष बागा व कांदा पीक उद्ध्वस्त झाले आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी. अशा सूचना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रशासनाला केल्या.

Team Agrowon

Nashik News : राज्यात मागील तीन-चार दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गारपिटीने द्राक्ष बागा व कांदा पीक उद्ध्वस्त झाले आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी.

तसेच पीकविमा कंपन्यांनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत पाठपुरावा करावा, अशा सूचना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रशासनाला केल्या.

बुधवारी (ता. २९) थोरात यांनी चांदवड व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली व हतबल झालेल्या शेतकऱ्यांना धीर दिला. या वेळी कसबे सुकेणे येथे भेटीप्रसंगी राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, तालुकाध्यक्ष विजय जाधव,

मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, उपसभापती देवराव मोगल आदी उपस्थित होते. या वेळी कसबे सुकेणेतील सुधाकर भंडारे, भाऊसाहेब भंडारे यांच्या गारपीटग्रस्त द्राक्षबागेला भेट दिली. पिंपळसच्या मत्सागर कुटुंबीयांचे सांत्वन केले.

थोरात म्हणाले, की द्राक्षबाग उभी करण्यासाठी मोठा खर्च येतो. संपूर्ण कुटुंब त्यासाठी वर्षभर राबते. सोसायटी, बँकेचे कर्ज घेऊन द्राक्षबाग उभारावी लागते. मात्र, अशा संकटात संपूर्ण शेतकरी कुटुंब ढासळते.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी यंदा बँकेकडून पीककर्ज घेऊन द्राक्षबागांवर जेवढा खर्च केला. तो सर्व वाया गेला आहे. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता, राज्य सरकार काहीही मदत करत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेचे पीककर्ज माफ करावे, अशी मागणी केली. बहादुरी (ता. चांदवड) येथील भेटीप्रसंगी माजी आमदार शिरीष कोतवाल, राजाराम पानगव्हाणे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. थोरात यांनी द्राक्ष उत्पादकांशी संवाद साधला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT