Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Crop Damage Survey : मराठवाड्यात ६५ हजार हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे

बीड जिल्ह्यात पंचनाम्याची गती सर्वात मंद तर धाराशिव व परभणी जिल्ह्यात पंचनामेची गती सर्वाधिक राहिल्याची स्थिती आहे.

Anil Jadhao 

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील अवेळी पाऊस गारपिटीमुळे नुकसान झालेल्या एकूण क्षेत्रापैकी ६५ हजार ६२० हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे आटोपल्याची माहिती विभागीय महसूल प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

बीड जिल्ह्यात पंचनाम्याची (Beed District Crop Damage Survey) गती सर्वात मंद तर धाराशिव व परभणी जिल्ह्यात पंचनामेची गती सर्वाधिक राहिल्याची स्थिती आहे.

मराठवाड्यात खरीप, रब्बी या दोन्ही हंगामावर पावसाची वक्रदृष्टी राहिली आहे. खरिपातील सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई अजूनही शेतकऱ्यांच्या पदरात पडणे बाकी आहे.

खरिपात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई देणे सुरू असल्याचे चित्र असले तरी हातात तोंडाशी आलेला रब्बीही मोठ्या प्रमाणात हातचा गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात १ ते २० मार्च दरम्यान १ लाख ६८ हजार ४५७ शेतकऱ्यांच्या १ लाख ३ हजार ३७४.२४ हेक्‍टरवरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने दिला होता.

त्यामध्ये ४५,५०७.८६ हेक्टर जिरायती, ५१,४१२.६८ हेक्टर बागायत तर ६४५३.७० हेक्टर फळ पिकांचा समावेश होता. नुकसान झालेल्या या क्षेत्रापैकी १ लाख ४११२ शेतकऱ्यांच्या ६५,६२०.४० हेक्टरवरील शेती पिकाचे पंचनामे २६ मार्च पर्यंत उरकले होते.

या पंचनामांमध्ये २७,५८५.५ हेक्टरवरील जिरायती, ३३१४२.५२ हेक्टरवरील बागायत तर ४८९३.८३ हेक्टरवरील फळ पिकांचा समावेश होता.

पंचनाम्याची गती धाराशिव व परभणी जिल्ह्यात सर्वाधिक होती. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेल्या एकूण क्षेत्रापैकी ९५ टक्के क्षेत्रांचे पंचनामे आटोपले होते. तर बीड जिल्ह्यात मात्र अजून ५० टक्केही पंचनामे झाले नसल्याची स्थिती होती.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ७८ टक्के, जालना जिल्ह्यात ६० टक्के, हिंगोली ६२ टक्के, नांदेड ५७ टक्के, लातूर ६९ टक्के पंचनामे उरकले होते.

जिल्हानिहाय नुकसानीचे क्षेत्र व प्रत्यक्ष पंचनामे (क्षेत्र हेक्टरमध्ये)

जिल्हा - नुकसानीचे क्षेत्र - प्रत्यक्ष पंचनामे क्षेत्र

छ. संभाजीनगर - १९३८२.८१ - १५१२४.४०

जालना - १५०९४.१७ - ९०६४.८७

परभणी - ५७२४.६ - ५४६०.६

हिंगोली- ५६०४ - ३४९१

नांदेड- २४६१३ - १४०६९

बीड - १६९९२- ८४३४

लातूर- १२३४०.३०- ८५१८.९७

धाराशिव - १५२५.९०- १४५८.१०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT