Cotton Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Surgical Cotton Variety : ‘सर्जिकल’ कापूस वाण विकसित

Cotton Research : ‘‘सर्जिकल (वैद्यकीय क्षेत्रासाठीचा) हेतूसाठी कापूस वाणाचा पर्याय नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने उपलब्ध करून दिला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘‘सर्जिकल (वैद्यकीय क्षेत्रासाठीचा) हेतूसाठी कापूस वाणाचा पर्याय नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने उपलब्ध करून दिला आहे. व्यावसायिक स्तरावर त्याला चालना मिळून त्या योगे कापूस उत्पादकांना त्याचा फायदा व्हावा, हा त्यामागील हेतू आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याची पाणीशोषण क्षमता अधिक आहे,’’ अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी दिली.

डॉ. प्रसाद म्हणाले, ‘‘आमच्या संस्थेने वैद्यकीय कारणांसाठी (सर्जिकल) कापसाचे सुधारित वाण विकसित केले आहे. त्यात बीटी तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे. अशा कापसाचे व्यावसायिक महत्त्व असल्याने त्याला चांगला दर मिळतो.

वेचणीअंती त्यावर प्रक्रिया केल्या जातात. त्यानंतर तो बाजारात उपलब्ध होतो. या कापसाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वाणाचा धागा आखूड असून, पाणी शोषण क्षमता अन्य वाणांच्या तुलनेत २५ टक्‍के अधिक आहे.

वैद्यकीय कारणांसाठीच्या कापूस वाणात हे वैशिष्ट्य प्रकर्षाने असावे लागते. त्यामुळे या वाणाच्या संशोधनात यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. शेतकरी किंवा कंपन्यांची मागणी असल्यास त्यांना या वाणाचे बियाणे काही प्रमाणात उपलब्ध करून देणे शक्‍य होईल.’’

वाणाची वैशिष्ट्ये

- धाग्यांची गुणवत्ता ‘मायक्रोनेअर’ या युनिटमध्ये ५.७ ते ६ पेक्षा अधिक

- कापड तयार करण्याकामी उपयोगी पडणाऱ्या कापूस वाणात हेच मायक्रोनेअर ३.५ ते ४.५ इतके राहते

- या वाणाचा कलर ग्रेड (आरडी) ७४-७५. म्हणजे हा वाण अधिक पांढरा दिसतो

- धागा आखूड असून पाणी शोषण क्षमता अन्य वाणांच्या तुलनेत २५ टक्‍के अधिक

महाराष्ट्रात सुमारे ३५ टक्‍के क्षेत्र कोरडवाहू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोरडवाहू तसेच हलक्‍या जमिनीसाठी हे वाण उपयुक्‍त आहे. अतिसघन पद्धतीनेही त्याची लागवड करता येते. त्या पद्धतीने हेक्‍टरी २० क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. त्याचा पक्व कालावधी कमी म्हणजे १२० ते १४० दिवसांचा आहे.
- डॉ. वाय. जी. प्रसाद, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT