Ladaki Bahin Scheme agrowon
ॲग्रो विशेष

Ladaki Bahin Scheme : 'लाडकी बहीण' योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं

Ladaki Baheen Yojana : राज्य सरकारांकडे ‘लाडकी बहीण’ यांसारख्या योजनांसाठी पैसे आहेत, पण न्यायाधीशांच्या पगार आणि पेन्शनसाठी त्यांच्याकडे निधी नाही.

sandeep Shirguppe

Supreme Court Ladaki Bahin Scheme : महाराष्ट्रानंतर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा काही पक्षांनी जाहीरनाम्यात समावेश केला आहे. निवडणूक जाहीरनाम्यांवर सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायाधीशांच्या आर्थिक सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या मुद्द्यावर अंतिम निर्णयासाठी सुनावणी पुढे चालू राहणार आहे.

राज्य सरकार नागरिकांना मोफत सुविधा वाटप करतात यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, राज्य सरकारांकडे ‘लाडकी बहीण’ यांसारख्या योजनांसाठी पैसे आहेत, पण न्यायाधीशांचा पगार आणि पेन्शनसाठी त्यांच्याकडे निधी नाही. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि ए.जी. मसीह यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणूक जाहीरनाम्यांचा संदर्भ दिला. निवडणुकीच्या आधी ‘लाडकी बहीण’सारख्या योजना जाहीर केल्या जात असल्याचा उल्लेख केला. दिल्लीतील काही पक्षांनी २ हजार १०० रुपये आणि २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे कोर्टाने नमूद केले.

दिल्लीतील पक्षांचे मोफत सुविधा जाहीरनामे

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात मोफत सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. आम आदमी पक्ष महिलांना दरमहा २ हजार १०० रूपये आर्थिक सहाय्य, तसेच मोफत वीज आणि पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे.

काँग्रेस पक्षाने महिलांना दरमहा २ हजार ५०० रूपये आणि ४०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे जाहीरनाम्यात सांगितले आहे. तर भाजपने ३०० युनिट मोफत वीज आणि महिलांना आर्थिक मदतीचा विचार जाहीरनाम्यात नमूद केले आहे. या सगळ्याचे दाखले सुप्रिम कोर्टात देण्यात आल्याने लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT