Water Tanker  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Supply : वन्यप्राण्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

सध्या नगर तालुक्यातील गुंडेगाव शिवार हे बारकाईने पाहिले असता हरणाचे काही कळप डोंगरात पाण्याच्या शोधार्थ भटकताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाण्याची सोय शेतकरी दिलीप धावडे यांनी केली आहे.

Team Agrowon

Nagar News : सध्या नगर तालुक्यातील गुंडेगाव शिवार हे बारकाईने पाहिले असता हरणाचे काही कळप डोंगरात पाण्याच्या शोधार्थ भटकताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाण्याची सोय शेतकरी दिलीप धावडे यांनी केली आहे.

पंचटेकडी परिसर, कोथूळ डोंगर, शुढळेश्‍वर परिसरात झाडे मोठ्या प्रमाणात रुक्ष झालेले आढळत आहेत.

वाळलेले झाडे तसेच पाणी या सर्वांचा परिणाम या पट्ट्यात कमी झालेले जंगली श्‍वापदे, पक्षी, प्राणी होय. याचे मुख्य कारण पाणी व अन्न होय.

म्हणूनच अशा या उन्हाळ्याच्या काळात आपलाही काही खारीचा वाटा म्हणून वन्यजीवांच्या (विशेषतः हरिण) पाणी पिण्यासाठी व्यवस्था करण्याचा विचार दिलीप धावडे यांच्या मनात आला आणि लगेच दिलीप धावडे यांनी स्वतः वन्यप्राण्यांसाठी टँकरद्वारे वनविभागाच्या हद्दीतील वनविभागाने तयार केलेला पाणवठ्यावर पाणीपुरवठा केला. साधारण वीस हजार लिटर पाण्याचा वन्यप्राण्यांना पाणीपुरवठा केला.

गावाला ८५० हेक्टर वनक्षेत्र आहे व सध्या उन्हाचे तापमान वाढल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी मी वन पाणवठ्यावर नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार आहे. मुक्या प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही.
दिलीप धावडे, शेतकरी, गुंडेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: गोंदियातील भूसंपादन रद्द करा; अन्यथा विदर्भात तीव्र आंदोलन छेडणार: लक्ष्मीकांत कौठकर

Agri Machinery : ट्रॅक्टरचलित बंदिस्त वाफे यंत्राचे प्रात्यक्षिक

Nashik Drought : नाशिक तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून मदत द्या

Drought Panchnama: दुष्काळी पंचनामे चार ते पाच दिवसांत पूर्ण होणार, शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल- कृषिमंत्री भरणे

Crop Metabolomics: ‘मेटाबोलोमिक्स’ तंत्रज्ञानातून उलगडणार पिकांतील जीवरासायनिक रहस्ये!

SCROLL FOR NEXT