Maharashtra Assembly  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : पुरवणी अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद करण्याची मागणी

Agriculture Loan Waive Scheme : आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर सभेत शेतकऱ्यांना दिले होते.

Team Agrowon

Akola News : आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर सभेत शेतकऱ्यांना दिले होते. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निधीची तरतूद केलेली दिसत नाही.

३१ मार्चपूर्वी कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करून पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे यासाठी शेतकरी मंडळाच्या पुढाकाराने मूर्तिजापूर येथे २१ फेब्रुवारीला आठवण मोर्चाही काढण्यात आला होता. त्या वेळी बैलगाडी, ट्रॅक्टरसह शेतकरी सहभागी झाले होते. आता अर्थसंकल्पात काही तरतूद होईल, अशी अपेक्षा असताना सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे या मुद्द्यावर जांभा खुर्द येथे बैठक घेत आंदोलनाबाबत चर्चा झाली.

यानंतर प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनमंच (नागपूर), आंतरभारती (पुणे), न्यू यंग क्लब, फार्मर्स ग्रुप, यंग बॉइज क्लब यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर स्नेहलता तायडे, कैलास साबळे, हरिदास फुके, विक्की तिवारी, तुषार हागे, सुदामराव तायडे, निखिल गावंडे, प्रफुल्ल मालधुरे, कृष्णकुमार शुक्ला, गोपाल तायडे, मुन्ना नाईकनवरे, नंदकिशोर बबानिया, सेवकराम लहाने, प्रमोद राजनदेकर, श्रीकांत वानखडे, सुरेश घाटे, अजय हांडे, जानराव मुळे, प्रा. सुधाकर गौरखेडे, डॉ. संजय उमाळे, हरिभाऊ वानखडे, अरुण बोंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. सरकारने अंदाजपत्रकात आश्‍वासन देऊनही कर्जमाफीसाठी अंदाजपत्रकात तरतूद न केल्याने शेतकरी पेटून उठणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT