Sunil Kedar Agrowon
ॲग्रो विशेष

Sunil Kedar : सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात; नार्वेकर कोणती भूमिका घेणार?

NDCCB Bank Scam Case : काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना न्यायलयाने शुक्रवारी (२२ रोजी) ५ वर्षांचा कारावास आणि १२.५० लाख रुपये शिक्षा सुनावली. त्यानंतर आता त्यांची आमदारकी देखील धोक्यात आली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Nagpur News : राज्याचे माजी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात आली आहे. नागपूरच्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने केदार यांना दोषी ठरवले आहे. तसेच केदार यांना ५ वर्षांच्या कारावासह १२.५० लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणात नागपूर पोलिसांनी विधीमंडळास केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीचा चेंडू हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्टात गेला आहे.

कोणत्याही खटल्यात आमदार किंवा खासदारांना दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाल्यास त्यांचे सद्यस्यत्व रद्द होते. केदार यांना बँक घोटाळा प्रकरणात पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. दरम्यान केदार यांना अचानक डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी केदार यांचा ECG काढला असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत.

नार्वेकर यांच्या कोर्टात चेंडू

केदार यांना बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी संपुर्ण माहिती नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला दिली आहे. त्यामुळे केदार यांच्या आमदारकीच्या निर्णयाचा चेंडू हा राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात गेला आहे. दरम्यान या प्रकरणी नार्वेकर कोणता निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सदस्यत्व धोक्यात

सध्या केदार यांना नागपूरच्या शासकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. तसेच न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात त्यांचे वकिल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ धाव घेणार आहेत. पण केदार यांना उच्च न्यायालयाने दिलासा न दिल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२ मध्ये घोटाळा झाला होता. हा घोटाळा १५२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा झाला होता. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष सुनील केदार होते. झालेल्या घोटाळ्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्याचा निकाल तब्बल 22 वर्षांनंतर लागला असून याप्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT