Sunflower Farming agrowon
ॲग्रो विशेष

Sunflower Sowing : सूर्यफूल पेरा वाढणार; बियाणे मुबलक देण्याची मागणी

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा सूर्यफूल पेरणी वाढेल, असे संकेत आहेत. सूर्यफूल बियाण्याचा तुटवडा यंदा नाही. यामुळे सूर्यफूल बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. भुईमूग पेरणीही खरिपात बऱ्यापैकी झाली आहे.

तेलबियांचे दर टिकून आहेत. तेलबियांना उठावदेखील आहे. सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा तेजी येत आहे. तसेच भुईमूग, सूर्यफुलाचे दरही टिकून आहेत. भुईमुगाचे एकरी १२ ते १३ क्विंटल उत्पादन अनेक शेतकऱ्यांना आले. त्याचे दरही बऱ्यापैकी मिळाले. तसेच सूर्यफुलाचे उत्पादनदेखील एकरी २० ते २२ क्विंटल एवढे आले.

त्याचे दरही प्रतिक्विंटल चार ते पाच हजारांपर्यंत मिळाले. यामुळे शेतकरी सूर्यफूल पेरणीकडे वळले आहेत. खानदेशात यंदा भुईमुगाची मिळून पाच हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर सूर्यफुलाची देखील सुमारे दीड हेक्टरवर पेरणी झाली आहे.

आणखी पेरणी सुरूच आहे. कारण अनेकांना पावसामुळे पेरणी करता आली नाही. ऑगस्टमध्ये खानदेशात खरिपातील सोयाबीन पेरणी करतात. परंतु यंदा पावसाने पेरणी लांबल्याची माहिती मिळाली.

खरिपातील सोयाबीन पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. आता सूर्यफूल पेरणीही अनेकांनी केली आहे. तर काही जण पेरणी करीत आहेत. सातपुडा पर्वत भागात ही पेरणी अधिक असणार आहे. जलसाठेही मुबलक आहेत. अनेक शेतकरी ठिबकवर सूर्यफूल पेरणीचे नियोजन करीत आहेत. काही शेतकरी तुषार सिंचनाचा उपयोग करून लागवडीचे नियोजन करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kisan Rail : किसान रेल्वेसाठी सोमवारी शेतकरी संघटनांचे आंदोलन

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पुढच्या नऊ हप्त्यांची तरतूद

Onion Subsidy : तेरा हजार शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत

Banana Rate : अकोला जिल्ह्यात केळीदर १६०० रुपयांपर्यंत स्थिर

Minister Abdul Sattar : पणनमंत्री सत्तार यांचा परिषदेतून काढता पाय

SCROLL FOR NEXT