Paddy Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Plantation : डहाणू तालुक्यात उन्हाळी भात लावणीला वेग

Paddy Farming : डहाणू तालुक्यातील शेतकरी उन्हाळी भातशेतीच्या कामात मग्न झाले आहेत. या वर्षी पाटबंधारे विभागाने कालवे जुने झाल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.

Team Agrowon

Palghar News : डहाणू तालुक्यातील शेतकरी उन्हाळी भातशेतीच्या कामात मग्न झाले आहेत. या वर्षी पाटबंधारे विभागाने कालवे जुने झाल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.

अनेक ठिकाणी ते नादुरुस्त झाल्यामुळे पाणी वाया जात होते. ते काम पूर्ण झाल्याने शेतीसाठी आवश्यक पाणी कालव्यातून सोडण्यात आले. त्यामुळे शेतकरी नव्या उमेदीने पुन्हा शेतीत गुंतले आहेत.

कालव्याच्या दुरुस्तीमुळे या वर्षी कालव्याला पाणी मिळेल की नाही, याबाबत शंका होती. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत होते; मात्र पाटबंधारे प्रशासनाने वेळीच निर्णय घेत कालव्यात पाणी सोडल्याने शेतकरी पुन्हा भातशेती लागवडीकडे वळले आहेत.

रायतळी, रणकोळ, ऐना, साखरे, आंबिवली, निकणे, रानशेत, वधना, शेल्टी आणि सारणी या गावांतील शेतकऱ्यांनी दुबार पेरणी व लावणीला सुरुवात केली आहे. कालव्याच्या पाण्यामुळे शेतीला संजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावर्षी कालव्याला पाणी मिळणार नाही, अशी भीती वाटत होती. त्यामुळे उन्हाळी भातशेती होणार नाही, असे वाटले होते; पण पाणी सोडल्याने आम्ही भात लागवड करीत आहोत. आता जास्त लक्षपूर्वक शेतीतून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो. कालव्याचे काँक्रीटीकरण बांधकाम झाल्याने पाणी चांगल्या प्रमाणात आम्हाला मिळते, असे शेतकरी निनाद पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरला तिसऱ्या टप्प्यात ८८ कोटी ८१ लाखांची कर्जमाफी

SCROLL FOR NEXT