Sugarcane Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : शाश्‍वत उत्पादन, हमीने पैसे देणारे उसाचे एकमेव पीक

Sugarcane Farming : दोन पावसाळ्यातील पाणी मिळत असल्याने आडसाली उसाची लागवड फायदेशीर आहे. आडसालीमुळे सोयाबीन किंवा खरिपाचे पीक हाती नाही लागले तरी त्याचा तोटा होत नाही.

Team Agrowon

Dharashiv News : शेती व्यवसाय आता बांधावरला राहिला नाही. शेतात थांबूनच शेती केली तर फायद्याची ठरते. ऊस हे शाश्‍वत उत्पादन व हमीने पैसे देणारे पीक असून, शेतकऱ्यांनी नियोजन करून हे पीक घेतल्यास एकरी शंभर टन उत्पादन निघू शकते.

त्यासाठी पाच फुटाच्या सरीत कांड्याऐवजी उसाच्या रोपाची लागवड करून ठिबक सिंचनाने पाणी द्यावे, असा सल्ला रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगरचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी शेतकऱ्यांना दिला.

दैनिक ‘सकाळ अॅग्रोवन’च्या वतीने खेड (ता. धाराशिव) येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित ‘अॅग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ‘ऊस व्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रायोजक रिवुलिस इरिगेशन इंडिया प्रा. लि. या सूक्ष्म सिंचन उद्योगातील आघाडीच्या कंपनीचे विभागीय व्यवस्थापक विजय आग्रे, राज्य व्यवस्थापक योगेश कुलकर्णी, येडशीचे मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल भुतेकर, नॅचरल मल्टिस्टेट सोसायटीचे संचालक बाळासहेब टेळे, रिवुलिस कंपनीचे कृषी तज्ज्ञ नितीन जाधव, नॅचरल शुगरचे संचालक बालाजी डोंगरे व रिवुलिसचे अधिकृत विक्रेते येडशीच्या साई मशिनरीचे संचालक संतोष लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. आवाड म्हणाले, की दोन पावसाळ्यातील पाणी मिळत असल्याने आडसाली उसाची लागवड फायदेशीर आहे. आडसालीमुळे सोयाबीन किंवा खरिपाचे पीक हाती नाही लागले तरी त्याचा तोटा होत नाही. ८६०३२ ही जात चांगले उत्पादन देते. लागवडीपूर्वी माती परीक्षण व पाणी व्यवस्थापन नितांत आवश्यक आहे.

दहा ते ११ महिन्यांचे फाउंडेशनचे उसाचे बेणे वापरावे. खोडव्याचे बेणे लागवडीला चांगले नाही. बेणे प्रक्रिया करूनच लागवड करावी. एकरी शंभर टनांचे उद्दिष्ट डोक्यात ठेवून नियोजन करावे. पाचट जाळू नये. उत्पन्न व उत्पादन खर्चाचा हिशेब ठेवल्यास एकरी उत्पादन वाढीला बळ मिळते.

श्री. आग्रे यांनी रिवुलिस कंपनी शंभर वर्षांपासून सूक्ष्म सिंचन उद्योगात कार्यरत असल्याचे सांगत कंपनीच्या ठिबक व तुषार सिंचन उत्पादनाचे महत्त्व अधोरेखित केले. श्री. भुतेकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी पोकरा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना आग्रे व आवाड यांनी समर्पक उत्तरे दिली. या वेळी किशोर लोमटे, वैभव गरड, हरिभाऊ माने, विठ्ठल गरड, बब्रुवान चिखले, दिलीप लोमटे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘अॅग्रोवन’चे सीनिअर एक्झिकिटिव्ही बालाजी थोडसरे यांनी सूत्रसंचालन केले. अॅग्रोवनचे जिल्हा बातमीदार विकास गाढवे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT