Sugarcane Crop Damage agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crop Damage : हंगामाच्या प्रारंभीच उसाला तुरे; उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

Sugarcane Season : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गळीत हंगामाला चांगली गती मिळाली आहे. परंतु अनेक तालुक्यात महापुराचा फटका बसल्याने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane Season : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस गळीत हंगामाला चांगली गती मिळाली आहे. परंतु अनेक तालुक्यात महापुराचा फटका बसल्याने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही तालुक्यात वातावरणातील बदलांमुळे तसेच यंदा लांबलेला पाऊस यामुळे उसाला तुरे फुटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचा परिणाम ऊस उत्पादनावर होणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

या भीतीने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळेच खते, बियाणे, मशागत, मजुरी याचा ताळमेळ कसा घालायचा, याचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतीतील पाण्याचा ओलावा कमी झालेला नाही. जास्त पाऊस व बदलते वातावरण याच्या तावडीतून वाचलेल्या उसाला तुरे फुटल्याने उसाचे वजन घटू लागले आहे.

यंदा महापूर, हुमणी, लोकरी मावा यामुळे नदीकाठच्या पूरबाधित उसाच्या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तुरे फुटलेल्या उसाला तत्काळ तोडणी देऊन कारखान्याने कार्यक्षेत्रातील उसाची तत्काळ उचल करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात आली आहे. परंतु साखर कारखानदारांकडून पहिला चांगला ऊस तोडण्यास प्राधान्य देत असल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे.

उसाला तुरे फुटल्याने ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. कारखान्यांनी पूरबाधित क्षेत्रातील उसाला तोड देऊन उसाची उचल करावी असे हातकणंगले तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी रावसो विठ्ठाणा यांनी सांगितलं.

ऊस पिकावर उदरनिर्वाह

ऊस हे पीक कोल्हापूर जिल्ह्यातील उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याने या पिकाच्या मशागतीस शेतकरी पूर्णवेळ देतात. या वर्षी उसाला कालावधीपूर्वीच तुरे फुटल्याने उत्पन्नात मोठा फटका बसणार असून, बळिराजा पूर्णपणे अडचणीत येणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी वेळेतच ऊस गळितास नेणे आवश्यक आहे. आले पिकाला कमी दर मिळत असल्याने बळिराजाची सर्व भिस्त सध्या उसावर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा विमान अपघात नेमका कसा झाला?, २२ पानांचा प्राथमिक अहवाल समोर

Onion Rate: सरकारचे निर्यातीचे धोरण, वाढलेला आवकेमुळे कांदा भाव पडले

Chana Procurement: परभणी, हिंगोलीत हरभरा विक्रीसाठी १९ केंद्रे

Unseasonal Rain: नांदेडला अवकाळीचा २९८ हेक्टरला फटका

Banana Price: केळीसाठी हमीभाव, शासकीय खरेदी केंद्रे सुरु करणे शक्य नाही, फलोत्पादन मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT