Sugarcane Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणी ठप्प

Sugarcane Season : पश्चिमेकडील काही कारखान्यांमध्ये ऊस तोडणी व गाळप सुरू असले तरी अत्यंत धीम्या गतीने व कमी क्षमतेने गाळप सुरू असल्याने कारखानदारांतही मोठी अस्वस्थता आहे.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्यात झालेला जोरदार पाऊस व शेतकरी संघटनांचे आंदोलन यामुळे जिल्ह्यातील ऊस तोडणीला मोठे अडथळे आले आहेत. यंदा ऊस कमी असल्याने एक नोव्हेंबरपासूनच राज्य शासनाने ऊस तोडणीला परवानगी दिली, परंतु शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ऊस तोडणी पूर्ण क्षमतेने सुरू राहू शकली नाही.

पश्चिमेकडील काही कारखान्यांमध्ये ऊस तोडणी व गाळप सुरू असले तरी अत्यंत धीम्या गतीने व कमी क्षमतेने गाळप सुरू असल्याने कारखानदारांतही मोठी अस्वस्थता आहे. त्याच्या पूर्व भागात म्हणजे हातकणंगले व शिरोळ तालुक्यात तर मोठी बिकट स्थिती निर्माण झाली आहे.

या तालुक्यामध्ये शेतकरी संघटनांचे प्राबल्य मोठे असल्याने मोठ्या कारखान्यांनाही गाळप करणे शक्य झाले नाही. दोन्ही तोडगा न निघाल्याने या भागातील ऊस तोडणी ही बंद आहे. बहुतांशी ठिकाणी ऊस तोडणी कामगार बसून असून ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काम नसल्याने या घटकांचे हाल होत आहेत.

तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसांत जिल्ह्याला पावसाने झोडपले. त्यामुळे पश्चिमेकडील जे कारखाने सुरू होते त्या कारखान्यांनाही ऊस तोडणी अशक्य झाल्याने यंदाचा हंगामाचा प्रारंभ निराशेच्या वातावरणात झाला आहे. बहुतांशी कारखान्याचे ऊसतोड मजूर कारखाना कार्यस्थळावर दाखल झाले आहेत.

ऊस तोडणीचा कार्यक्रम त्यांना दिला असला तरी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी ऊस तोडणीला विरोध करीत आहेत. कारखान्याकडे निघालेला ऊस अडवून उसाचे नुकसान करत असल्याने अनेक कारखानदारांनी तोडणी थांबण्याची भूमिका घेतली आहे. हंगाम सुरू होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी अनेक कारखान्याचे गाळप काही हजार टन झाली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा

Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार

Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Onion Storage Tips: कांदा साठवताना होणाऱ्या चुका टाळा, नुकसान वाचवा

Rural Roads Survey: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

SCROLL FOR NEXT