Sugarcane Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : कोल्हापुरात ऊस तोडणीस सुरवात

Sugarcane Season : राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस हंगाम सुरू झाला असला तरी जिल्ह्यात शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे मात्र ऊस तोडणी अतिशय धीम्या गतीने सुरु होती.

Team Agrowon

Kolhapur News : ऊस दराचे आंदोलन मागे घेतल्यानंतर ज्या साखर कारखान्यांनी समझोत्याप्रमाणे पत्रे दिली आहेत, त्या साखर कारखान्यांच्या ऊस तोडींना शुक्रवार (ता.२४) पासून प्रारंभ झाला. मात्र ज्या कारखान्यांनी पत्रे दिली नाहीत, त्यांच्या ऊस तोडी अद्याप सुरू झालेल्या नाहीत.

अनेक कारखाने जिल्हा प्रशासनाला पत्रे सादर करण्याच्या प्रयत्नात होते. यामुळे दोन दिवसांत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा अंदाज आहे. राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस हंगाम सुरू झाला असला तरी जिल्ह्यात शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे मात्र ऊस तोडणी अतिशय धीम्या गतीने सुरु होती.

बुधवारी (ता. २२) याबाबतचा निर्णय झाल्‍यानंतर गुरुवार (ता. २३) पासून अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी कामाने गती घेतली. अजूनही काही कारखान्यांनी नव्या समझोत्यानुसार पत्र देण्याबाबत विचारविनिमय सुरु केला होता. राज्‍याच्या इतर भागांच्‍या तुलनेत जिल्हा ऊस गाळपामध्ये पिछाडीवर आहे. आंदोलन मिटल्याने कारखानदारांबरोबर ऊस उत्पादकांमध्‍येही समाधान आहे.

शेट्टींसहित सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा

दरम्‍यान, गुरुवारी पुणे बंगळूर महामार्ग रोखल्याने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या सहित सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांवर शिरोली पोलिस ठाण्‍यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सलग आठ ते नऊ तास महामार्ग रोखल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT