Sugarcane FRP Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सांगली जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली

Sugarcane Season : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पंधरा दिवसापासून गाळप सुरु केले आहे. मात्र, या दरम्यान, ऊस दराचा प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पंधरा दिवसापासून गाळप सुरु केले आहे. मात्र, या दरम्यान, ऊस दराचा प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते. त्यातच राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव- सुरुल व कारंदवाडी युनिटकडील सन २०२४-२५ हंगामातील उसास पहिला हप्ता ३२०० रुपये प्रतिटन देणार आहे, असे जाहीर करून जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली आहे.

मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पहिला हप्ता मान्य करणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यात १४ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केले. दरम्यान, आचारसंहिता असल्याने साखर कारखान्यांनी दराचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यातील कोणता साखर कारखाना दराची कोंडी फोडणार याकडे लक्ष होते.

मात्र, गाळप हंगाम सुरु होवूनही पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ गेला तरीही पहिली उचल देण्याबाबत कारखान्यांनी मौन बाळगले होते. त्यामुळे संघटना आक्रमक झाली होती. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दर प्रश्न सोडवण्यासाठी सोमवार (ता. ९) जिल्हाधिकारी यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना अशी बैठक लावली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष या बैठकीकडे लागून लागले होते.

त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी कोल्हापूर प्रमाणे बैठक घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली होती. त्यामुळे बैठक होणार का अशी चर्चा सुरु झाली होती. त्यातच अचानकच राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव- सुरुल व कारंदवाडी या युनिटकने २०२४-२५ हंगामातील उसास पहिला हप्ता ३२०० रुपये प्रतिटन देणार असल्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी जाहीर केले. तसेच जत-तिप्पेहळ्ळी युनिटचा ऊस दराचा निर्णय लवकर घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

वास्तविक पाहता, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिला हप्ता विनाकपात ३७०० रुपये द्यावा तसेच मागील वर्षाचे अंतिम बिल २०० रुपये प्रमाणे द्यावे अशी मागणी केली आहे. परंतु राजारामबापू साखर कारखान्याच्या तीन युनिटने पहिला हप्ता ३२०० रुपये जाहीर केले आहे.

त्यामुळे राजारामबापू साखर कारखान्यांने ऊस दराची कोंडी फोडत जाहीर केले दर मान्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच मागील वर्षाचे अंतिम बिलाबाबत अद्यापही कोणत्याही कारखान्याने स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे या दोन्ही मागण्यासाठी आंदोलन करणार की तोडगा मान्य करणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमुक्तीसाठी कोणते शेतकरी पात्र?; पुनर्गठित कर्जाबाबतही महत्त्वाचा निर्णय

Tembhu Irrigation Scheme: ‘टेंभूचे उन्हाळी आवर्तन बंद; ६० ठिकाणचे शेतकरी पाण्याविना

Seed Drill Machine: पेरणी यंत्र वापरताना चुका टाळा; उगवण आणि उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

Agrowon Podcast: हरभरा भावात सुधारणा; सोयाबीन टिकून, कापसाला उठाव, कारले स्थिरावले तर तूर दबावातच

Native Cotton Seeds: देशी कापूस वाणांसाठी शेतकरी जाताहेत परराज्यांत

SCROLL FOR NEXT