Sugarcane Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : कोल्हापूर पूर्व भागात ऊस तोडणी बंदच

Sugarcane Harvesting : ऊसदराचा तिढा अद्याप न मिटल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागातील ऊस तोडी पूर्णपणे ठप्प राहिल्याचे चित्र शुक्रवारी (ता. १७) होते.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : ऊसदराचा तिढा अद्याप न मिटल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागातील ऊस तोडी पूर्णपणे ठप्प राहिल्याचे चित्र शुक्रवारी (ता. १७) होते. पश्चिम भागातील काही कारखान्यांची ऊस तोडणी सुरू होती. शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे न घेतल्याने ही ऊस तोडणी ही रखडतच सुरू आहे. पूर्व भागातील बहुतांश कारखान्यांचे ऊस तोडणी मजूर बसूनच आहेत.

ऊस तोडणी वेगाने सुरू नसल्याने अनेक कारखानदार चिंतेत आहेत. गुरुवारी (ता.१६) शेतकरी संघटना व कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाल्यानंतर देखील तोडगा निघू शकला नाही. कारखानदारांनीही तातडीने ऊस तोडणी आम्ही सुरू करू, असे भाष्य केलेले नाही. यामुळे ऊस तोडणीचा तिढा कायम राहिल्याचे चित्र दिसले.

संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही कारखान्याने ऊस तोडणी सुरू केलेली नाही. दोन दिवसांपूर्वी उसाने भरलेल्या बैलगाड्या शिवारातच उलट्या केल्याने ऊस तोडणी कामगारांत भीतीचे वातावरण आहे. परिणामी साखर कारखान्यांनी ही तोडणी कामगारांना ऊस तोडणीसाठी फारसा दबाव टाकला नसल्याचे चित्र होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT