Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvesting : कोल्हापूरच्या पूर्व भागात पावसाने ऊस तोडी ठप्प

Unseasonal Rain : जिल्ह्याच्या पूर्व भागात बुधवारी रात्री (ता. ३०) झालेल्या पावसाने ऊस तोडणीत अडथळे निर्माण झाले. विशेष करून हातकलंगले, शिरोळ तालुक्यांत सायंकाळी आठ ते रात्री अकरापर्यंत जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Kolhapur News : जिल्ह्याच्या पूर्व भागात बुधवारी रात्री (ता. ३०) झालेल्या पावसाने ऊस तोडणीत अडथळे निर्माण झाले. विशेष करून हातकलंगले, शिरोळ तालुक्यांत सायंकाळी आठ ते रात्री अकरापर्यंत जोरदार पाऊस झाला. नुकत्याच सुरू झालेल्या ऊस हंगामात पावसामुळे चिंता निर्माण झाली आहे.

तालुक्याच्या बहुतांश भागाला मॉन्सूनोत्तर पावसाने झोडपून काढले. ढगांच्या कडकडाटात झालेल्या या पावसाने ऊस हंगामापुढे गाळपाच्या उद्दीष्टपूर्तीचा प्रश्न निर्माण झाला. आधी ऊसदराच्या आंदोलनाने तीन आठवडे लांबलेल्या गाळप हंगामापुढे आता मॉन्सूनोत्तर पावसामुळे व्यत्यय निर्माण होण्याचा धोका आहे. यामुळे साखर कारखानदारांसह शेतकऱ्यांमध्ये चिंता वर्तविली जात आहे.

शेतकरी संघटनांनी ऊस दरासाठी आंदोलन केल्याने तीन आठवडे कारखाने बंद आहेत. काही कारखान्यांनी ऊस नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आंदोलकांनी वाहने पेटविण्याबरोबर वाहने पलटी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शेतकऱ्यांनीही धोका न पत्करता ऊस तोडी नाकारल्या. आंदोलनाचा हंगामावर परीणाम झाला.

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. उसाची वाढही म्हणावी अशी झाली नाही. शिवाय लांबलेला हंगाम यामुळे कारखानदार आणि शेतकऱ्यांना उसाची चिंता होती. आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर हंगाम सुरळीत होईल, असे वाटत असतानाच दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने हंगामापुढे पुन्हा चिंता निर्माण केली आहे.

पावसाने तोडीला आलेल्या उसाच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले. अद्याप कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. मजूर, वाहनांची जुळवाजुळव यासाठी कारखानदारांची धावपळ सुरू आहे.

पावसाने ऊस तोडीची क्रमपाळी बदलून जाणार आहे. रस्त्यालगतचा ऊस तोडण्यावर भर द्यावा लागणार असला तरी उसाने भरलेली वाहने शेताबाहेर काढण्याची कसरतही शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. मंगळवारी व बुधवारी झालेल्या पावसाने किमान आठवडाभर तरी ऊस तोडीचे गणित बसणार नाही, अशी स्थिती आहे. शिवाय आणखी काही दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरी आणि कारखानदारांपुढे चिंता व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT