Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : नांदेड विभागात ऊस गाळपाला गती

Sugarcane Season : नांदेड विभागात मागील काही वर्षांपासून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर ॲड एनर्जी लि., माखणी हा खासगी साखर कारखाना गाळपात आघाडीवर असतो.

Team Agrowon

Nanded News : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात २८ साखर कारखाने सुरू झाले आहेत. या कारखान्यांनी शुक्रवारअखेर (ता.१५) ३२ लाख ४७ हजार ९११ टन उसाचे गाळप झाले तर २७ लाख ३२ हजार ८२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्राने दिली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२३-२४ साठी ३० कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यातील आजपर्यंत २९ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. यातील २८ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. यात १९ खासगी, तर ९ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

शुक्रवारअखेर (ता. १५) ३२ लाख ४७ हजार ९११ टन उसाचे गाळप, तर २७ लाख ३२ हजार ८२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखरेचा सरासरी उतारा ८.९१ टक्के असल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. नांदेड विभागात सर्वाधिक दहा साखर कारखाने लातूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत.

यात पाच साखगी, तर पाच सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यानंतर परभणी जिल्ह्यात सात कारखाने सुरू झाले आहेत. हे सर्वच कारखाने खासगी आहे नांदेड जिल्ह्यात सहा कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यात पाच खासगी, तर एक सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी, तर तीन सहकारी साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे.

गाळपात यंदाही गंगाखेड शुगर आघाडीवर

नांदेड विभागात मागील काही वर्षांपासून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर ॲड एनर्जी लि., माखणी हा खासगी साखर कारखाना गाळपात आघाडीवर असतो. यंदाही या कारखान्याने आपली आघाडी कायम राखली आहे. आजपर्यंत या कारखान्याने विभागात सर्वाधिक दोन लाख ७५ हजार टन उसाचे गाळप केले आहे. तर त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यातीलच ट्वेंटीवन शुगर लि., सायखेडा सोनपेठ या कारखान्यानेही बाजी मारत आजपर्यंत दोन लाख ३६ हजार टन उसाचे गाळप केले आहे.

कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन

(गाळप टनांत साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन

नांदेड सहा ०५,५१,०९३ ०४,६१,०८५

लातूर १० १२,८४,२५१ ११,३८,०००

परभणी सात १०,३६,०९० ०८,४०,४९०

हिंगोली पाच ०३,७६,४७७ ०२,९३,२५०

एकूण २८ ३२,४७,९११ २७,३२,८२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT