Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : रावळगाव कारखान्याचा गळीत हंगाम महिलांच्या हस्ते सुरू

Sugarcane Crushing : रावळगाव साखर कारखान्यात २१ ऊस उत्पादक महिलांच्या हस्ते गव्हाण पूजन व गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.

Team Agrowon

Nashik News : रावळगाव साखर कारखान्यात २१ ऊस उत्पादक महिलांच्या हस्ते गव्हाण पूजन व गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. कारखान्यात प्रथमच महिलांच्या हस्ते गळिताचा प्रारंभ झाला. मंचावर नगरसूल आश्रमाचे नवनाथबाबा तसेच महिला होत्या. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे संयोजन महिलांनीच केले.

देशातील खासगी क्षेत्रातील रावळगाव हा पहिला साखर कारखाना आहे. मध्यंतरीच्या काळात विविध अडचणींशी सामना करत कारखाना पुन्हा सुरु झाला.कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या वर्षी प्रायोगिक हंगामात सव्वा लाख मेट्रीक टन उसाची गाळप केली.यावर्षी महिलांच्या हंगामाचा प्रारंभ झाला.

पूजा कराड (निफाड) यांनी शेतात राबून ऊस उत्पादन घेणाऱ्या महिलांना अध्यक्षांनी सन्मानाने मंचावर बसवून महिलांच्याच हस्ते गळिताचा प्रारंभ केल्याचा अभिमान वाटतो. शेतकऱ्यांनी ऊस लागवड वाढवून ऊस द्यावा, असे आवाहन केले. वंदना गायकवाड म्हणाल्या, की दीड वर्षातच अध्यक्षांनी सर्वांचा विश्वास संपादन केला.

ऊस उत्पादकांनी असेच सहकार्य करावे. नवनाथबाबा यांनीही अध्यक्ष गायकवाड रावळगावला गतवैभव प्राप्त करून देतील, असा विश्वास व्यक्त केला. संचालक प्रवर्तक मंडळ कुटुंबांच्या हस्ते ऊस उत्पादक महिलांचा स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ देऊ सन्मान करण्यात आला.

स्नेहल दगडे यांनी प्रस्ताविक केले. स्मिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.कावेरी टिळेकर यांनी आभार मानले. कारखाना ऊस लागवडीसाठी बेणे तसेच चांगला दर देईन. यावर्षी उच्चांकी ऊस गाळपाचा मानस आहे.

येत्या वर्षात बायोप्रॉडक्ट सुरू केले जातील. गावातील २५० ते ३०० तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.कारखाना परिसरात ऊस लागवड वाढवावी. जेणेकरून ऊसतोड व वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होईल.-बबनराव गायकवाड, अध्यक्ष, रावळगाव कारखाना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT