Sugarcane Harvesting Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : नांदेड विभागात १५ कारखान्यांची धुराडी पेटली

Sugarcane Crushing : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात २९ साखर कारखान्यांनी राज्याच्या साखर आयुक्ताकडे गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत.

Team Agrowon

Nanded News : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात २९ साखर कारखान्यांनी राज्याच्या साखर आयुक्ताकडे गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी १५ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत.

या कारखान्यांनी मंगळवारअखेर (ता. ३) दोन लाख ८६ हजार १०३ टन उसाचे गाळप केले आहे. तर एक लाख ७७ हजार ७५ क्विंटल साखरचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल दिली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२४-२५ साठी २९ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यातील काही कारखाने वगळता बहुतांश कारखान्यांना गाळप परवाना मिळाला आहे. यातील १५ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. यात १० खासगी, तर पाच सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

मंगळवारअखेर (ता.तीन) या कारखान्यांनी दोन लाख ८६ हजार १०३ टन उसाचे गाळप केले आहे. तर एक लाख ७७ हजार ७५ क्विंटल साखरचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल दिली. साखरेचा सरासरी उतारा ५.६४ टक्के नांदेड विभागात सर्वाधिक पाच साखर कारखाने लातूर जिल्ह्यात सुरू झाले आहेत.

यात तीन खासगी तर दोन सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यात तीन कारखाने सुरू झाले आहेत. हे सर्वच कारखाने खासगी आहेत. नांदेड जिल्ह्यात चार कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यात तीन खासगी तर एक सहकारी साखर

कारखान्याचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात तीन कारखाने सुरू झाले आहेत. यात एक खासगी दोन सहकारी साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. दरम्यान, साखर कारखाने विलंबाने सुरू झाल्यामुळे विभागात गाळपाला अद्याप गती आली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT