Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP: प्रतापगड कारखान्याकडून साडेतेरा कोटींचे ऊस बिल जमा

Sugarcane Crushing: प्रतापगड साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरू असून १६ ते ३१ या कालावधीत ४५०६८.१३३ टन उसाचे गाळप करण्यात आले.

Team Agrowon

Satara News : अजिंक्यतारा- प्रतापगड उद्योग समुहाच्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याकडून १६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे १३ कोटी ५२ लाख ४ हजार रुपये एवढे पेमेंट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती उद्योग समूहाचे मार्गदर्शक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

प्रतापगड साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरू असून १६ ते ३१ या कालावधीत ४५०६८.१३३ टन उसाचे गाळप करण्यात आले.

या गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३ हजार रुपये याप्रमाणे १३ कोटी ५२ लाख ४ हजार रुपये एवढी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती मंगळवारी (ता. ६) वर्ग करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेत जाऊन खात्री करावी.

दरम्यान, यापूर्वी ५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत ९६५२४.००५ टन उसाचे गाळप झाले होते. त्याचे प्रतिटन ३ हजार रुपये याप्रमाणे २८ कोटी ९५ लाख ७२ हजार रुपये एवढे ऊस बिल यापूर्वीच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करण्यात आले होते.

९४ दिवसांमध्ये दोन लाख ३३ हजार ६३० टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. सरासरी साखर उतारा ११.३३ टक्के असून दोन लाख ५९ हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT