ajit pawar agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Workers Strike : साखर कामगारांचा बेमुदत संप स्थगित; त्रिपक्षीय समिती स्थापन, अजित पवार यांची मध्यस्थी

Ajit Pawar : त्रिपक्ष समिती राज्यातील साखर कारखान्यांना कामगारांच्या मागण्यांवर विचार करून सहा महिन्यांत शिफारशींसह शासनास अहवाल सादर करणार आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Politics : राज्य सहकार कारखाना संघाच्या आवाहनानुसार सोमवारपासूनचा (ता. १६ डिसेंबर) साखर कामगारांचा बेमुदत संप स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने घेतला. ही माहिती मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर व जोडधंद्यातील कामगारांच्या वेतनवाढी व अन्य मागण्यांसंबंधी चर्चा केली. यामध्ये साखर कारखानदार, कामगार प्रतिनिधी व शासन प्रतिनिधी यांची त्रिपक्ष समिती स्थापन करण्यात आली. त्रिपक्ष समिती राज्यातील साखर कारखान्यांना कामगारांच्या मागण्यांवर विचार करून सहा महिन्यांत शिफारशींसह शासनास अहवाल सादर करणार आहे.

या त्रिपक्ष समितीमध्ये कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले, राऊसाहेब पाटील, अविनाश आपटे आणि पी. के. मुंडे, आनंदराव वायकर आदींसह एकूण १३ प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. तर निमंत्रित सदस्यांमध्ये अॅड. भूषण महाडिक, तर शासन प्रतिनिधी म्हणून साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, कामगार आयुक्त, तर सदस्य सचिव म्हणून कल्याण आयुक्त रविराज इळवे (कामगार कल्याण मंडळ, मुंबई) यांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील आणि महाराष्ट्र राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड पी. के. मुंडे, सरचिटणीस कॉम्रेड आनंदराव वायकर यांच्या उपस्थितीत पूर्वघोषित केलेला १६ डिसेंबरपासूनचा बेमुदत संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT