Sugarcane Crushing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : मोहोळमधील कारखान्यांत ४ लाख टन ऊस गाळप ; एकरी वजनाचा उतारा कमी; शेतकऱ्यांचे नुकसान

Sugarcane Crushing Season : मोहोळ तालुक्यातील चार साखर कारखान्यांच्या माध्यमातून चालू गळीत हंगामात एक महिन्याच्या कालावधीत चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, तीन लाख पोती साखरेचे उत्पादन झाले आहे.

Team Agrowon

Mohol News : मोहोळ : मोहोळ तालुक्यातील चार साखर कारखान्यांच्या माध्यमातून चालू गळीत हंगामात एक महिन्याच्या कालावधीत चार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, तीन लाख पोती साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा नऊ बसत असून, चालू वर्षी भरपूर पाऊस पडूनही उसाच्या वजनात घट झाली आहे.

एकरी सरासरी लागणीच्या उसाला केवळ ४० ते ४५ टन तर खोडव्याला सरासरी ३० ते ३५ टन उतारा बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान, अनगर (ता. मोहोळ) येथील लोकनेते ॲग्रो इंडस्ट्रीज या कारखान्याने ऊस गाळपात व साखर उत्पादनात बाजी मारली आहे.

गेल्या वर्षी दुष्काळ असल्याने व विहिरी, बोअर यांची पाणीपातळी घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस मोडून टाकला. ज्याला थोडेफार पाणी होते त्यांनी ऊस जोपासला. सध्या २५ टक्के लागण तर ७५ टक्के खोडवा ऊस आहे. मात्र चालू वर्षी भरपूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडी केल्या आहेत. चालू वर्षी उसाचे प्रमाण कमी असल्याने उसाची पळवापळवी नाकारता येत नाही.

कधी कडक थंडी तर कधी ढगाळ वातावरण या वातावरण बदलाचा परिणाम सरासरी साखर उताऱ्यावर झाला आहे. ऊस लागवडीसाठी बेणे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी बाहेर गावाहून साडेसहा हजार रुपये प्रतिगुंठ्याने बेणे विकत आणून ऊस लागवड केल्याने, शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. ऊस गळीत हंगाम सुरू होण्याअगोदर पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने उसाला प्रतिटन साडेतीन हजार रुपये दर जाहीर केला आहे.

मोहोळ तालुक्यातील भीमा कारखान्याने प्रतिटन दोन हजार ७०० प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर उसाचे बिल जमा केले आहे. दरम्यान, कारखान्याने चालू गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरविले असून, इतर कारखान्यांबरोबर दर देण्यास कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी सांगितले. आष्टी शुगर या कारखान्यानेप्रतिटन दोन हजार ८०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर उसाचे बिल जमा केले आहे. तोडणी वाहतुकीचीही बिले जमा केली आहेत. मात्र जकराया शुगर व लोकनेते ॲग्रो इंडस्ट्रीज या कारखान्यांनी अद्यापही उसाचे दर जाहीर केले नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT