AI In Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

AI Sugarcane Farming : साखर कारखान्याच्या अध्यक्ष, एमडींकडून ‘एआय’च्या ऊसपीक प्रात्यक्षिकाची पाहणी

AI In Agriculture : ‘एआय’ तंत्राच्या उसाची उत्पादकता ४० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आणि पाण्याची बचतही जवळपास ४० ते ५० टक्क्यांपर्यंत झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.

सुदर्शन सुतार

Baramati News : अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या वतीने कृषी विज्ञान केंद्रात राबवण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशएल इंटेलिजन्स) आधारित ऊसशेतीच्या प्रात्यक्षिक प्रयोगाची राज्यभरातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांनी शनिवारी (ता.१५) कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर उत्सुकतेने पाहणी केलीच, पण विविध प्रश्नांचीही उत्तरे जाणून घेतली.

‘एआय’चे हे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचावे, यासाठी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) आणि बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलमपेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील साखर कारखान्याचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांच्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा आणि ऊसपीक प्रात्यक्षिक पाहणी आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून सुमारे ३०० ते ३५० जण यासाठी उपस्थित होते.

कृषी विज्ञान केंद्राच्या या प्रक्षेत्रावर एआय तंत्रज्ञान आणि पारंपरिक पद्धतीने अशा दोन्ही पद्धतीच्या सहा प्रकारच्या उसाची लागवड करण्यात आली आहे. या दोन्ही पद्धतींची तुलना याठिकाणी करता यावी, असे हे प्लॅाट तयार करण्यात आले आहेत. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे, प्रा. तुषार जाधव यांनी या दोन्ही उसातील तुलना करून त्यातील निष्कर्ष यावेळी सांगितले.

‘एआय’ तंत्राच्या उसाची उत्पादकता ४० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आणि पाण्याची बचतही जवळपास ४० ते ५० टक्क्यांपर्यंत झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. त्याशिवाय एआय तंत्रज्ञानातील प्रमुख घटक असलेले वेदरस्टेशन आणि सेन्सरचे कार्य आणि सॅटेलाईटद्वारे होणारे मॅपिंग कसे चालते, याचीही सविस्तर माहिती या वेळी देण्यात आली.

या वेळी काही प्रतिनिधींनी उसाला या तंत्रात पाण्याची नेमकी किती गरज राहू शकते, उसाचे वजन, आकार, उंची याची पाहणी करून त्यांच्या शंका विचारून घेतल्या. तसेच या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेताना, कोणत्या पद्धतीने आणि काय करावे, याचीही माहिती घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT