Sugarcane Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : उत्तर सोलापूर तालुक्यातील साखर कारखान्यांची धुराडी बंद

Sugarcane Crushing : तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, तिऱ्हे येथील सिद्धनाथ शुगर, बीबी दारफळ येथील लोकमंगल ॲग्रो या तिन्हीही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे.

Team Agrowon

Solapur News : तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, तिऱ्हे येथील सिद्धनाथ शुगर, बीबी दारफळ येथील लोकमंगल ॲग्रो या तिन्हीही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. यामध्ये सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वांत जास्त गाळप करत साखर उताऱ्यातही अव्वल क्रमांक ठेवला आहे. मात्र, एकाही कारखान्याने अद्याप उसाची संपूर्ण बिले अदा न केल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

उत्तर सोलापूर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या या तिन्ही साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. तालुक्यात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना या सहकारी साखर कारखान्यासोबत तिऱ्हे येथील सिद्धनाथ शुगर, बीबी दारफळ येथील लोकमंगल ॲग्रो या दोन खासगी कारखान्यांचा समावेश आहे.

दोन्ही खासगी कारखान्यांचा गळीत हंगाम जानेवारी महिन्यातच आटोपला तर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा हंगाम १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहिला. या हंगामात तालुक्यात सर्वांत जास्त ऊस गळीत हे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने केले आहे.

त्या खालोखाल सिद्धनाथ शुगर या कारखान्याचा क्रमांक लागतो तर सर्वांत कमी गाळप हे लोकमंगल ॲग्रो कारखान्याने केले आहे. तालुक्यात एकूण नऊ लाख ६८ हजार ८१२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, पाच लाख ४९ हजार ९४० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

यावर्षीही ऊस बिलासंदर्भात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने डिसेंबर महिनाअखेर गाळपास आलेल्या उसाची रक्कम अदा केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, तालुक्यातील इतर दोन खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम मोठ्या प्रमाणात थकवली असल्याची बाब समोर येत आहे.

कारखान्याच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत फार मोठी भर पडली आहे. त्याचबरोबर यावर्षी ऊसतोड टोळ्यांनी ऊस तोडणी करताना उसाचे फड जाळून नेण्याची पर्यावरणाला घातक अशी पद्धत सुरू केली; याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे त्याचबरोबर कारखान्यांचेही नुकसान झाले आहे.

उ. सोलापूर तालुक्यातील गाळप व साखर उत्पादन

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, कुमठे

एकूण गाळप ५ लाख ८६ हजार ५०५ मे. टन

सरासरी साखर उतारा ९.६६ टक्के

सिद्धनाथ शुगर, तिऱ्हे

एकूण गाळप २ लाख ५२ हजार २ मे. टन

सरासरी साखर उतारा ८.११ टक्के

लोकमंगल ॲग्रो, बीबी दारफळ

एकूण गाळप १ लाख ३० हजार ३०५ मे. टन

सरासरी साखर उतारा ६.९६ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT