Nagar News : माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यासाठी यंदा ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामांसाठी भरीव निधी मंजूर झाला असल्याची माहिती इंद्रजित थोरात यांनी दिली आहे.
संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी मोठा निधी मिळवला आहे. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून १७१ गावे व २५० च्या पुढे वाडी वस्ती असलेला हा तालुका आहे.
संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिमेंट बंधारे, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना यांसह अनेक विकासाच्या योजना आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने राबविल्या आहेत.
सहकारातून समृद्धी निर्माण झालेला हा तालुका राज्यात विकसित असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये गणला जातो.
यंदा ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे येळुशी ठाकरवाडी वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृहासाठी ५ लाख, मोरदरा ठाकरवाडी आदिवासीवस्ती अंतर्गत सामाजिक सभागृहासाठी ५ लाख, पिंपळगाव देपा येथे मोंधळवाडी येथील घाणे वस्ती मध्ये रस्ता क्रॉक्रेटीकरणासाठी १० लाख.
शिरसगांव धुपे येथे शिरसगांव ते बांगरवस्ती रस्ता मजबुतीकरणासाठी व गटार व मोरी टाकणेसाठी १० लाख व शिरसगांव धुपे सभामंडप बांधकामासाठी १० लाख, साकुरसाठी आनंदवाडी अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरण ५ लाख, हळदावस्ती अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरणासाठी ५ लाख,माळवाडी वस्ती रस्ता क्रॉक्रेटीकरणासाठी ५ लाख, जोगेपठार अंतर्गत रस्ता क्रॉक्रेटीकरणासाठी ५ रहिमपूर गावासाठी आदिवासी फॉरेस्ट वस्ती रस्ता क्रॉक्रेटीकरणासाठी १३ लाख. आश्वी खुर्द गावासाठी आदिवासी समाज दफनभूमी संरक्षण भिंत बांधणेसाठी १० लाखांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.