Rabi Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Production : ग्राम बीजोत्पादनांतर्गत रब्बीत गहू बियाण्यास अनुदान

Subsidy For Wheat Seed : या योजनेत तालुकानिहाय लक्ष्यांक देण्यात येत आहे. ग्राम बीजोत्पादनातून गहू पिकाला ४० किलो एकर (०.४० हे.) मर्यादेत एका शेतकऱ्याला ६४० रुपये अनुदानावर बियाणे देय आहे.

Team Agrowon

Akola News : शेतकऱ्यांना गहू पिकासाठी अनुदान दिले जाणार आहे. शेतकरी स्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने बियाणे व लागवड साहित्य उपभियानांतर्गत (एसएमएसपि) ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम (एसव्हीएस) हा घटक राबविण्यात येतो, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली.

या योजनेत तालुकानिहाय लक्ष्यांक देण्यात येत आहे. ग्राम बीजोत्पादनातून गहू पिकाला ४० किलो एकर (०.४० हे.) मर्यादेत एका शेतकऱ्याला ६४० रुपये अनुदानावर बियाणे देय आहे. अनुदानासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात परमिट वाटप करण्यात येणार आहेत.

त्यासाठी मूळ आधार कार्ड, सातबारा आणि मागासवर्गीय शेतकरी असल्यास जातीच्या दाखल्याची स्वयंसाक्षांकित प्रत आवश्यक आहे. या योजनेत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्यल्प/अल्पभुधारक (अपंग, महिला, माजी सैनिक आत्महत्याग्रस्त कुटुंब) शेतकऱ्यांना ०.४० हे मर्यादेपर्यंत ४० किलो बियाणे प्रति लाभार्थी मिळू शकेल.

प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्त्वावर वाटप करण्यात येईल. प्रमाणित बियाणे वितरण घटकांतर्गत गहू पिकाचे वाण उपलब्धतेप्रमाणे वितरित करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गहू पिकाचे अनुदानित दराने प्रमाणित बियाणे मिळण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अधिकृत बियाणे वितरकाकडून अनुदानित दराने ग्राम बीज उत्पादन खरेदीचा लाभ घ्यावा असेही किरवे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT