Donkey Milk  Agrowon
ॲग्रो विशेष

Donkey Milk Study : गाढविणीच्या दुधातील औषधी गुणधर्माचा अभ्यास सुरू

Medicinal Properties : लॅक्‍टोजचे प्रमाण अधिक आणि फॅट कमी असलेले गाढविणीचे दूध अनेक आजारांवर प्रभावी ठरू शकते. त्यामुळे या दुधातील औषधी गुणधर्मांचा अभ्यासत तज्ज्ञ करीत आहेत

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : लॅक्‍टोजचे प्रमाण अधिक आणि फॅट कमी असलेले गाढविणीचे दूध अनेक आजारांवर प्रभावी ठरू शकते. त्यामुळे या दुधातील औषधी गुणधर्मांचा अभ्यास महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठअंतर्गत असलेल्या उदगीर येथील पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयातील तज्ज्ञ करीत आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी दिली.

गाढविणीचे दूध मानवी आरोग्यासाठी उपयुक्‍त असल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे. या संदर्भात डॉ. मोहम्मद रजियोद्दीन म्हणाले, की गाढविणीचे दूध मानवी दुधासारखे आहे. या दुधात ९० टक्‍के पाणी असते. लॅक्‍टोजचे प्रमाण अधिक तर फॅट कमी आहे. दुधातील जिवाणू, बुरशीजन्य रोग प्रतिकारक्षमतेविषयी अभ्यास होणार आहे.

लहान मुलांच्या पोटदुखीवर हे दूध प्रभावी ठरते का, याचाही अभ्यास ‘माफसू‘कडून होणार आहे. हे दूध हायपोॲलर्जेनिक असून त्यामुळे यात ॲलर्जी कमी करण्याची क्षमता आहे. या दुधाचा साबण, क्रीम, सौंदर्यप्रसाधनामध्ये वापर करण्याबाबतही विशेष अभ्यास करण्यात येणार आहे.

एक गाढवीण दर दिवसाला सरासरी ८०० मिलि दूध देऊ शकते. गाढविणीचे आरोग्य, आहार, वातावरण असे अनेक घटक दूध उत्पादनावर परिणाम करतात. या दुधामध्ये प्रथिने १.५ ते १.८, फॅट ०.२ ते १.०, लॅक्‍टोज ६.० ते ७.०, कॅल्शिअम ०.१ ते ०.२, लॅक्‍टोफेरिन ०.२ ते ०.०३, जीवनसत्त्व बी ०.०३, जीवनसत्त्व अ ०.०५, जीवनसत्त्व ड ०.०००५ टक्‍का असते.

गाढविणीच्या दुधातील आरोग्यदायी घटकांबाबत विशेष संशोधन करण्यात येत आहे. दुधापासून पावडर तयार करण्यासाठी वेगळी प्रक्रिया विकसित झाली आहे. सध्या फ्रिज डाईंग व स्प्रे ड्रायर पद्धतीनुसार दूध पावडर तयार केली जाते.
डॉ. मोहम्मद रजियोद्दीन, सहायक प्राध्यापक, पशुवैद्यकीय पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर. मो. ७५८८०६२५५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushimitra Recruitment Scam: कृषिमित्र भरती रॅकेट प्रकरणी फौजदारी कारवाईचे आदेश

Fake Fertilizer: खताच्या नावाखाली चक्क मातीची विक्री

Rohit Pawar: मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही : रोहित पवार

Fertilizer Purchase Rules: खतासाठी आता सातबारा, आधारची सक्ती नाही

Agriculture Support: धान उत्पादकांसाठी तमिळनाडूचे विशेष पॅकेज

SCROLL FOR NEXT