ZP Education Agrowon
ॲग्रो विशेष

ZP School : पटसंख्या घसरल्याने २० शिक्षक निलंबित

ZP Education : ११ जून रोजी झालेल्या बैठकीत, संबंधित शिक्षकांना या घटलेल्या पटसंख्येबाबत समाधानकारक खुलासा करता न आल्याने सकृतदर्शनी जबाबदार धरून तडकाफडकी निलंबनाचे आदेश काढण्यात आले.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या झपाट्याने घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासनाने कडक पावले उचलली असून, तब्बल २० शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये नांदुरा तालुक्यातील ५ शाळांचे शिक्षक असून, त्यांच्या अकार्यक्षमतेचा थेट फटका शाळेच्या अस्तित्वावरच बसला आहे. जिल्ह्यातील १ ते १० पटसंख्येच्या शाळांमध्ये गेल्या काही वर्षांत विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

११ जून रोजी झालेल्या बैठकीत, संबंधित शिक्षकांना या घटलेल्या पटसंख्येबाबत समाधानकारक खुलासा करता न आल्याने सकृतदर्शनी जबाबदार धरून तडकाफडकी निलंबनाचे आदेश काढण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश

मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या आदेशात निलंबीत शिक्षकांना तत्काळ त्यांच्या संबंधित पंचायत समिती मुख्यालयावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, कारवाईचा उलट टपाली अहवाल देखील देण्यास सांगण्यात आले आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, काही संघटनांनी या कारवाईचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्याचे संकेत दिले आहेत.

आठ तालुक्यांतून शिक्षक निलंबित

नांदुरा तालुक्यातील ५, बुलडाणा चार, मोताळा तीन, मेहकर दोन, चिखली दोन, लोणार दोन, खामगाव एक, शेगाव एक अशा शिक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यात खासगी शाळांचे पेव फुटले असताना, गावपातळीवरच्या जिल्हा परिषद शाळांना पटसंख्येसाठी धडपडावे लागत आहे. मात्र अनेक शिक्षकांनी वेळेवर उपाययोजना न करता शाळांची गळतीच वाढवली, असा ठपका प्रशासनाने ठेवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT