Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : संघर्षशील शेतकरीच इतरांचा खरा प्रेरणास्रोत

Indian Farmer : नोकरदार, पेन्शनधारक अशाच बहुतांश व्यक्‍तींची शेती फायद्यात आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिक उत्कर्ष साधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Team Agrowon

Amaravati News : नोकरदार, पेन्शनधारक अशाच बहुतांश व्यक्‍तींची शेती फायद्यात आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिक उत्कर्ष साधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र कष्ट, प्रयोगशीलता, शेतीपूरक व्यवसायाच्या बळावर भरारी घेतलेले असे शेतकरी पुढे समाजासाठी खरे प्रेरणास्रोत ठरतात असे प्रतिपादन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले.

कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताहाच्या निमित्ताने दुर्गापूर केव्हीके येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार रावसाहेब शेखावत, केव्हीकेचे प्रमुख डॉ. के.पी. सिंग, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांची यावेळी उपस्थिती होती.

खासदार बोंडे यांनी यावेळी नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा सेवारत अनेक व्यक्‍ती शेतमाल साठवणुकीसाठी गोदामांसह शेडनेट, पॉलिहाऊस व इतर अनेक शेतीपूरक उपक्रम ते उभारतात. त्यावर मोठा खर्चही ते करतात. अशा व्यक्‍तींचीच शेती फायद्याची ठरत असल्याचे ते म्हणाले. अमरावती महापालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी यावेळी कृषी विस्तारात केव्हीकेची भूमिका मांडली.

विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी दुर्गापूर केव्हीकेच्या माध्यमातून बेडवरील पीक लागवडीला प्रोत्साहन दिले जात असल्याने अतिवृष्टीच्या काळात हे तंत्रज्ञान पीक वाचविण्यात उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे, अशा शब्दात केव्हीकेच्या कामाचा गौरव केला. कार्यक्रमाच्या सुरवातीला केव्हीके प्रमुख डॉ. के.पी. सिंह यांनी प्रास्ताविकातून दुर्गापूर केव्हीकेच्या वाटचालीचा आलेख मांडला.

केव्हीकेच्या माध्यमातून ३० ते ३५ हजार शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोचविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केव्हीकेचे संपर्क शेतकरी असलेल्या उद्योजक महिलांचा खासदार बोंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यासोबत कृषक स्वर्ण समृद्धी रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

सूत्रसंचालन डॉ. अर्चना काकडे यांनी केले तर संतोष देशमुख यांनी आभार मानले. यावेळी प्रताप जायले, प्रफुल्ल महल्ले, डॉ. हर्षद ठाकूर, महेश आखुड, राहुल घोगरे, आकाश धरमकर, सुरेश वैद्य, आरती वर्मा, ज्ञानेश्‍वर जिराफे, सचिन पिंजरकर, प्रणाली देशमुख, अश्‍वीनी रंगे, निशा राठोड, स्नेहा सवाई यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT