Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : भडका ऊसदर आंदोलनाचा! कारखानदारांच्या विरोधात हजारो आंदोलक शेतकरी रस्त्यावर, संघर्ष अटळ

Sugarcane Agitation : शिरोळ तालुक्यात सकाळपासूनच जोरदार आंदोलन सुरू झाल्याने ऐन दिवाळीतच वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane FRP Rate : मागच्या ८ दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊसदराच्या मुद्दावरून जोरदार आंदोलन सुरू आहे. दरम्यान कारखानदार शेतकरी संघटनांच्या मागण्या मान्य करत नसल्याने आंदोलनाला आता हिंसक वळण लागत चालले आहे. मागच्या दोन दिवसांत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस तोडी बंद पाडण्याबरोबर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, बैलगाड्या, अंगत या वाहनांची हवा सोडण्याबरोबर पेटवली जात आहे.

दरम्यान आज शिरोळ तालुक्यात सकाळपासूनच जोरदार आंदोलन सुरू झाल्याने ऐन दिवाळीतच वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त साखर कारखान्याची ऊस तोड सुरू असलेल्या शेतात घुसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोड बंद करत बैलगाडी पलटी केली. यादरम्यान साखर कारखान्याचे कार्यकर्ते, पोलीस आणि शेतकरी संघटनेचे आंदोलक यांच्यात जोरदार झटापट झाली. याचबरोबर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी संघटना व आंदोलन अंकूश या दोन्ही संघटना एकत्र आल्याने आंदोलनाची ताकद आणखी वाढली आहे.

शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे गुरुदत्त कारखान्याकडून ऊस तोड सुरू होती. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि कारखाना समर्थक आमनेसामने आले. गुरुदत्त कारखान्याच्या ऊस तोड सुरू असल्याने बाळूमामा मंदिराजवळ ऊस अडविण्यासाठी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून बसले आहेत. तर ऊस वाहतूक करण्यासाठी कारखाना समर्थक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याने जलद कृती दल बोलावून मोठा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान कारखानदारांच्या प्रतिनीधींकडून राजू शेट्टींना आव्हान दिल्याने आक्रमक कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

कारखानदार ऊस तोड करण्यासाठी ताकद लावत आहेत तर आंदोलकही तेवढ्याच त्वेषाने त्याला विरोध करत असल्याचे चित्र दिसत आहे. गटवर्षीच्या उसाला ४०० रुपये जादा आणि यंदाच्या हंगामातील उसाला ३५०० रुपये एकरकमी दिल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नाही अशी संघटनेची आक्रमक भूमिका आहे. तर काल रात्री वारणा साखर कारखान्याकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले.

गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ३५०० रुपये द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.वारणा कारखान्याची वाहतूक का रोखली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केल्याने काल रात्री या कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले.

रात्री वारणा सहकारी साखर कारखान्याचा ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अज्ञात लोकांनी पेटविला. ही घटना वठार – पारगाव रस्त्यावरील चावरे फाट्याजवळ घडली आहे. शासन व कारखानदार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करू लागल्याने लोकांची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

हातकणंगले तालुक्यातील काही कार्यकर्त्यांवर उसाची वाहतूक अडवल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना लवकरात लवकर सोडण्यासाठी स्वाभिमानीच्यावतीने पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात ऐन दिवाळीतच आंदोलनाचा भडका उडाल्याने शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: निमगाव दुडेतील डांंळिंब बागेला इस्राईलच्या तज्ज्ञांची भेट

Agriculture Inspection: पुणे जिल्ह्यात बोगस निविष्ठांवर कृषी विभागाची करडी नजर 

Maharashtra Politics: काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपच काँग्रेसयुक्त

Agricultural Excellence Award: वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

India Alliance March: इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोर्चा

SCROLL FOR NEXT