Katewadi Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : जालन्यातील लाठीमाराच्या निषेधार्थ बारामतीत कडकडीत बंद

Baramati Maratha Reservation Protest : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी, ता. बारामती या गावी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवले होते.

Team Agrowon

Baramati News : झेंडा कोणत्याही पक्षाचा असो, मात्र त्यांचा दांडा हा मराठा समाजाचा आहे, जो आरक्षण देईल, त्याच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा राहील, असा निर्धार सोमवारी (ता. ४) बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त केला गेला.

जालना येथे मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा व त्या नंतर झालेल्या सभेत अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्या प्रसंगी हा निर्धार व्यक्त झाला.

मराठा समाजाच्या महिलांना मारहाण झाली, ही बाब संतापजनक असून अशा घटना घडल्यास मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा दिला गेला. मराठा क्रांती मोर्चामध्ये दुफळी माजविण्याचा काही जणांचा राजकीय डाव असला तरी मराठा समाज एकसंघच असेल, असा निर्धार या प्रसंगी बोलून दाखविण्यात आला. मराठा समाजाला राजकीय आरक्षणापेक्षाही शैक्षणिक व सामाजिक आरक्षण जास्त महत्त्वाचे वाटते, हे आरक्षण मिळण्यासाठी समाज एकसंघ असेल, असेही वक्त्यांनी नमूद केले.

केंद्राने आगामी काळात बोलाविलेल्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अध्यादेश जारी करावा, अशीही मागणी केली गेली. राज्यात व केंद्रात मराठा समाजाचे खासदार आमदार असूनही गेल्या चाळीस वर्षांत आरक्षण मिळत नाही याबाबत खेद व्यक्त केला गेला.

आरक्षणावर एकत्र का येत नाही...?’

सरकार पाडणे व बनविणे यासाठी थेट गुवाहाटीपर्यंत आमदारांना जाता येते, मग आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र का येता येत नाही, असा संतप्त सवाल वक्त्यांनी उपस्थित केला.

शांततेतील मोर्चा आता नाही....

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात ५८ मूक मोर्चे अत्यंत शांततेने मराठा बांधवांनी काढले, पण त्याचा काहीही उपयोग न झाल्याने आता सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून मराठा समाजाचे मोर्चे निघतील, त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशाराही दिला गेला. या पुढील काळातील मोर्चे हे मंत्रालयावर काढण्याची तयारी करण्याचेही सूतोवाच केले गेले. या पुढील मोर्चा हा मूक मोर्चा नसेल तर तो ठोक मोर्चा असेल असेही जाहीर केले गेले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT