Cotton Productivity  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Productivity : उत्पादकता वाढीसाठी कपाशीचे काटेकोर व्यवस्थापन हवे

Cotton News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन योजनेअंतर्गत कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत जागतिक कापूसदिनी बाभळगाव येथे प्रक्षेत्र भेट व गटचर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Parbhani News : कपाशीच्या झाडाची उंची वाढविण्यापेक्षा जास्तीत जास्त पाते, फुले, बोंडे लागून ती टिकविण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे. उत्पादकता वाढीसाठी घनपद्धतीने लागवड, शेंडा खुडणे, पातेगळ कमी करण्यासाठी उपाययोजना, गळ फांद्या काढून टाकणे, योग्य खत व्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन योजना प्रभारी अधिकारी तथा कापूस कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक जाधव यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन योजनेअंतर्गत कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत (आयआरएम) तर्फे जागतिक कापूसदिनी शनिवारी (ता. ७) पेठ बाभळगाव (ता. पाथरी) येथे प्रक्षेत्र भेट व गटचर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. जाधव बोलत होते. कृषी कीटकशास्त्रज्ञ तथा प्रकल्प समन्वयक डॉ. डी. डी. पटाईत, कृषिभूषण बाबासाहेब रणेर आदींची उपस्थिती होती.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सहकार्याने कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्प परभणी जिल्ह्यातील पेठ बाभळगाव, लोणी बुद्रुक व टाकळगव्हाण (ता. पाथरी) खानापूर व पिंगळी (ता. परभणी) या गावांमध्ये राबविण्यात येत आहे.

प्रकल्पांतर्गत प्रति गाव १२ शेतकरी याप्रमाणे एकूण ६० शेतकऱ्यांच्या शेतावर गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना जैविक कीटकनाशके, ट्रायकोकार्डस, कामगंध सापळे, रासायनिक कीटकनाशके निविष्ठा वाटप करण्यात येत आहेत. डॉ. पटाईत म्हणाले, की कपाशीमध्ये कीटकनाशकांचा  अवाजवी वापर कमी करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT