Hailstorm Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : विदर्भाला वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

Rain Update : विदर्भात मंगळवारी (ता. १०) सकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला.

Team Agrowon

Pune News : विदर्भात मंगळवारी (ता. १०) सकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला. अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू ,संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले. तर चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली.

पश्चिम विदर्भात अवकाळीने धुमाकूळ घालत गहू, लिंबू, आंबा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले. खामगाव तालुक्यात गारपीट झाली. मराठवाड्यातही नांदेड, परभणी, बीड, लातूर जिल्ह्यांत पाऊस झाला आहे.

पूर्व विदर्भातील ब्रम्हपूरी (चंद्रपूर), अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत सोमवारी (ता.८) रात्री पाऊस झाला. अमरावती जिल्ह्यात गारपीट झाल्याने संत्रा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. वरुड, मोर्शी या भागांत मंगळवारी (ता.९) पहाटे गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले. त्याचा मोठा फटका संत्रा बागायतदारांना बसला.

वरुड तालुक्‍यातील वघाळ, वाडेगाव, लोणी, शिंगोरी, इत्तमगाव, वंडली, वडाळा, नांदगाव, गाडेगाव, हातुर्णा या भागांसह इतरही अनेक गावे बाधित झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. वर्धा जिल्ह्यात पावसाने भुईमूग पिकाचे नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यातही तुरळक पावसाने हजेरी लावली.

मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसला. रब्बी ज्वारी, गहू, फरदड कापूस, हळद, आंबा, टरबूज आदी फळपिकासंह भाजीपाल्याचे नुकसान झाले. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांत रब्बी ज्वारीचे पीक आडवे झाले.

गहू, हळद भिजली. आंबा, टरबूज, संत्रा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. हळद काढणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतीमालही भिजला. बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई तालुक्यात हलका पाऊस झाला.

सायगाव, पोखरी, नांदगाव, सुगाव आदी शिवारांत पावसाचा जोर राहिला. लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हा पाऊस नांदेड, कंधार, लोहा, नायगाव तालुक्यांत झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lakhpati Didi Scheme: लखपती दीदी २.०! महिलांना मिळणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

Fodder Planning: चारा नियोजनावर द्या लक्ष...

Maharashtra Drought: केवळ दुष्काळाची घोषणा नको! शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या, शेतकरी नेत्यांची मागणी

Agrowon Podcast: मूग बाजारात चढ-उतार, कांदा दरात बदल, कोबीच्या आवकेत चढ-उतार, कोथिंबिरीच्या दरात घसरण तर डाळिंब दर तेजीत

Maharashtra Rain Update: राज्यात कोणत्या भागात पावसाची शक्यता?

SCROLL FOR NEXT