Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीने नुकसान वाढतेच

Pre-Monsoon Rain Damage : खानदेशात वादळ, गापिटीने पीकहानी सुरूच आहे. यातच रविवारी (ता. १८) दुपारी व सायंकाळी जळगाव, धुळ्यातील अनेक भागांत वादळी पाऊस झाला. यात मका, केळी, बाजरी, कांदा आदी पिकांना मोठा फटका बसला.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात वादळ, गापिटीने पीकहानी सुरूच आहे. यातच रविवारी (ता. १८) दुपारी व सायंकाळी जळगाव, धुळ्यातील अनेक भागांत वादळी पाऊस झाला. यात मका, केळी, बाजरी, कांदा आदी पिकांना मोठा फटका बसला.

खानदेशात मार्चपासून आतापर्यंत वादळी, पाऊस, गारपीट, अशी संकटांची मालिका सुरू आहे. यात सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. या महिन्यात गारपीट व वादळात सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र जळगावात बाधित झाले आहे.

तर धुळ्यात दीड हजार आणि नंदुरबारमध्ये एक हजार हेक्टरला फटका बसला आहे. यातच टक्केवारी कमीअधिक दाखविली जात असल्याने अनेक तलाठी पंचनामे टाळत आहेत. फक्त वारा होता, एक सेकंद गारा पडल्या, अशी बतावणी प्रशासनातील कृषी सहायक व तलाठी करीत असल्याने अनेक शेतकरी पंचनाम्यांपासून वंचित आहेत.

रावेरमध्ये केळीच्या नुकसानीसंबंधी सुमारे दोन कोटी रुपयांची हानी झाली आहे. मका, कांदा, बाजरी आदी पिके जमिनीवर लोळली असून, त्यांची कणसे जमिनीला टेकली आहेत. माती लागून त्यांचे नुकसान होत आहे.

हे नुकसानदेखील प्रशासनाने ग्राह्य धरलेले नाही. शेतीकामांवर या वादळी पावसाचा परिणाम झाला आहे. तसेच फळ पिकांची काढणी रखडत असून, टोमॅटो, केळी, पपईचे दर दबावात आले आहेत. केळी दरात एकाच दिवसात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची घट झाली आहे.

या महिन्यात तिसऱ्यांना गारपीट व वादळी पाऊस झाला आहे. रविवारी जळगाव जिल्ह्यात एरंडोल, जळगाव, भुसावळ आदी भागांत वादळी पाऊस झाला. यामुळे केळी, मका, कांदा, बाजरीचे नुकसान झाले. धुळ्यातही धुळे, साक्री, शिरपूर भागांत पाऊस झाला. तेथे गारपीट झालेली नसल्याची माहिती आहे.

तर नंदुरबारमध्येही सायंकाळी अनेक गावांत सुसाट वारा व तुरळक पाऊस झाला. सध्या बाजरी, मका कापणी, मळणीची कामे सुरू आहेत. पण पावसाळी स्थितीमुळे त्यात व्यत्यय येत आहे. मजुरी अधिकची लागत आहे.

अनेक भागांत केळीची पाने फाटली. तसेच गारपिटीने नुकसानदेखील झाले आहे. सुमारे दोन ते अडीच मनिटे काही भागात गोटीच्या आकाराच्या गारा पडल्या. तसेच लिंबू पिकात फळगळ झाली आहे. रोज पाऊस व वादळ येत असल्याने नुकसानीचे आकडे वाढत आहेत. शेतकरी या वातावरणामुळे चिंतेत असून, मोठी हानी होत असल्याने वित्तीय संकटे तयार होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT