Agriculture Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : पावसाने शिवारातील वीजपुरवठा होतोय विस्कळीत

Power Supply : खानदेशात रोज पाऊस, वादळ अशी स्थिती आहे. वळवाच्या पावसात पिकांसह चाऱ्याची हानीदेखील धुळ्यातील शिंदखेडा, साक्री भागात झाली आहे. अनेक भागांत वीजखांब वाकले आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रोज पाऊस, वादळ अशी स्थिती आहे. वळवाच्या पावसात पिकांसह चाऱ्याची हानीदेखील धुळ्यातील शिंदखेडा, साक्री भागात झाली आहे. अनेक भागांत वीजखांब वाकले आहेत. तसेच ताराही तुटून विस्कळीत झाल्या आहेत. त्या रोज दुरुस्त करण्याची धावपळ वीज कंपनीचे कर्मचारी करीत आहेत.

कांदा, भुईमूग काढणी पूर्ण होत आली आहे. भुईमुगाचा चारा परिसरात अनेक शेतकरी साठवितात. हा चारा दुधाळ पशुधनासाठी लाभदायी असतो. परंतु या चाऱ्याची मोठी हानी परिसरात झाली आहे.

पाऊसमान कमी असल्याने जेमतेम कृत्रीम जलसाठ्यांच्या मदतीने पिकांचे सिंचन केले. त्यात पीक काढणीवर आले. अशात काढणी झाल्यानंतर वादळी पाऊस झाला. त्यात शेतातील चाऱ्याची नासाडी झाली. कारण कमी पावसातही भुईमुगाच्या चाऱ्याचे नुकसान होते.

पाऊस असतानाच उष्णताही वाढली आहे. तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसवर आहे. उष्णतेने शेतात काम करताना अंगाची लाहिलाही होत आहे. त्यात विजेचे खांब वाकल्याने वीजपुरवठा शिवारात बंद आहे.

अनेक केबल्स तुटल्या आहेत. साक्री तालुक्यातील निजामपूर भागातही पाऊस, वादळाने चाऱ्याचे नुकसान झाले आहे. तसेच विजेचे खांब वाकल्याने वीजपुरवठ्याची अडचण आली. सातपुडालगत व अन्य भागात ऐन काढणीच्या काळात पाऊस आल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. काढणीची कामे बंद आहेत. बाजरी, भुईमूग शेतातच पडून आहे.

मध्यंतरी चोपडा, जळगाव, धरणगाव, एरंडोल भागात गारपीटदेखील झाली आहे. नंतर पाऊसही झाला. वादळी पावसात वीज यंत्रणेचे नुकसानही झाल्याने अडचणी आहेत. कारण लागलीच ऊन पडत आहे.

केळी, पपई, भाजीपाला पिकांचे सिंचन करावे लागत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पावसाचे पाणी शिरले. यात कांद्याचे नुकसान झाले आहे. तसेच पुढील कापूस लागवड व अन्य कामे लांबणीवर पडल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT