Banana Crop Loss Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Loss: वादळी पावसाने जळगाव जिल्ह्यात केळीची पुन्हा हानी

Farmer Crisis: जिल्ह्यात रविवारी (ता. २९) दुपारी व सायंकाळी अनेक भागात वादळी पाऊस झाला. यात चोपडा व रावेर तालुक्यातील केळी, मका, पपई आदी पिकांची मोठी हानी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News: जिल्ह्यात रविवारी (ता. २९) दुपारी व सायंकाळी अनेक भागात वादळी पाऊस झाला. यात चोपडा व रावेर तालुक्यातील केळी, मका, पपई आदी पिकांची मोठी हानी झाली आहे. काढणी, कापणीवर आलेल्या केळीबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. रविवारी दुपारी दुपारी ढगांची जमवाजमव झाली.

लागलीच सुसाट वारा व पाऊस, असे संकट आले. यात चोपडा तालुक्यातील अजंतीसीम, विटनेर, मोहिदे, वाळकी, दगडी, कुसुंबा, अनवर्दे, घोडगाव भागात वादळी पाऊस झाला. रावेरातील ऐनपूर, खिर्डी, कोळदे, धामोडी व लगत वादळी पावसात केळीबागा जमीनदोस्त झाल्या. सुमारे अर्धा ते पाऊणतास वादळी पाऊस झाला.

तसेच रावेरातील दसनूर, सावदा, वाघाडी, विवरे, कुसुंबा खुर्द, तांदलवाडी, निंबोल, भाटखेडा, पुनखेडा, निंभोरा, चिनावल, खिरवड, थेरोडे, गारखेडा, कुंभारखेडा या भागातही वादळी पाऊस झाला. चोपडा तालुक्यातील धानोरे, चांदसणी भागातही वादळी पावसात मका, केळीची हानी झाली आहे.

यात वीजपुरवठादेखील रात्री बंद झाला. ऐनपूर - खिर्डी दरम्यानच्या रस्त्यांवर मोठे वृक्ष उन्मळून पडले. तसेच वीजताराही तुटल्या. यामुळे वीजपुरवठा अनेक गावांत रविवारी रात्री बंद झाला. सोमवारी (ता. ३०) वीजपुरवठा सुरळीत करण्याची कसरत सुरू झाली.

रावेर तालुक्यात सुमारे ५०० ते ६०० हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा अंदाज आहे. तर चोपडा तालुक्यातही सुमारे ५०० ते ७०० हेक्टरवरील केळीला फटका बसल्याची माहिती आहे. चोपडा तालुक्यात अनेकांच्या केळीबागा काढणीवर आल्या होत्या. निसवलेल्या बागा जमीनदोस्त झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT