Nashik Rain Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Damage : वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान

Nashik Thunderstorm : निफाड, येवला, बागलाण व नांदगाव तालुक्यांत शुक्रवारी (ता.१३) पावसाचा जोर दिसून आला. रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली, तर वीजपुरवठा खंडित झाला होता.

Team Agrowon

Nashik News : निफाड, येवला, बागलाण व नांदगाव तालुक्यांत शुक्रवारी (ता.१३) पावसाचा जोर दिसून आला. रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली, तर वीजपुरवठा खंडित झाला होता. दोन ठिकाणी वीज पडून जनावरे मृत्युमुखी झाली, तर वादळी वाऱ्यामुळे कांदाचाळ, घरांचे पत्रे उडाले आहेत. यात कांद्याचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले.

येवला शहर व परिसरात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी दाणादाण उडाली. निफाड तालुक्यातही ओझर शहर, दहाव्या मैल परिसरात हा पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी वाहत होते, तर अनेक ठिकाणी ओढे-नाल्यांना पाणी आल्याने सर्वत्र परिसर पाणीच पाणी झाले. मध्यरात्रीपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती.

नांदगाव तालुक्यातील मनमाड परिसरातही शुक्रवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. परिणामी मनमाड शहर परिसरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोलमडली होती.

अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाल्याची पाहायला मिळाले. क्रांतीनगर (ता.नांदगाव) येथे नाना मोकळ यांचा घराजवळ लिंबाच्या झाडावर वीज पडून एक म्हैस, शनिवारी (ता.१४) वेहळगाव येथील खंडू पंडित दळवी यांची गाय, तर परधाडी अरुण नानासाहेब पवार यांचा वीज पडून मृत्युमुखी पडला.

कांद्याचे नुकसान

नांदीन (ता.बागलाण) येथील कांदाचाळीवरील पत्रे उडाल्याने साठविलेला कांदा भिजला आहे. कांद्याचे सुमारे एक लाख नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.खामलोण रस्त्यालगत नामपूरचे शेतकरी विजय मुथा यांची कांदाचाळ जमीनदोस्त झाली. चाळीत सुमारे चारशे क्विंटल कांद्याचे लाखो आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पोल्ट्री शेड वादळामुळे पूर्णपणे जमीनदोस्त

बागलाण तालुक्यातील काकडगाव शिवारातील शेतकरी केदा दादाजी पवार यांची (गट क्र.२६) मधील पोल्ट्री शेड वादळामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. या शेडमध्ये दुसऱ्या दिवशी कोंबड्यांची पिल्ले टाकण्याची तयारी सुरू होती. मात्र रात्रीच्या वादळामुळे संपूर्ण शेड उद्ध्वस्त झाल्याने श्री. पवार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT