Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह पावसाने केळी पिकांचे नुकसान

Heavy Rain Crop Loss : तेल्हारा तालुक्यात दाणापूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

 गोपाल हागे

Akola News : तेल्हारा तालुक्यात दाणापूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ हेक्टर क्षेत्रातील केळी पीक उद्ध्वस्त झाले आहे.

वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा अक्षरशः उखडून टाकल्या आहेत. केळीचे घड मोडून पडले असून उत्पादनास मोठा फटका बसला आहे. याशिवाय मका, ज्वारी, भुईमूग, मिरची, टोमॅटो यांसारख्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकरी निखिल मिसाळ, सोपान महाले, भगवान ढगे, गिरिधर हागे आदींच्या शेतातील केळीचे संपूर्ण झाडासह घड तुटून पडले. अनेकांनी लाखो रुपये खर्च करून लावलेली केळी एका दिवसात जमीनदोस्त झाली. त्याचप्रमाणे, काढणीस तयार असलेला व सुकविण्यासाठी टाकलेला भुईमूग ओला झाला.

गुरांसाठी साठवलेला चारा व कुटारही भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी टीनपत्रे उडाल्याची नोंद झाली असली, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे त्वरित पाहणी करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मी एक हेक्टर केळी पिकांची लागवड केली होती. मला या एक हेक्टरला एकूण अडीच लाख रुपये खर्च आला. माल निघण्याच्या अवस्थेत असताना अचानक वादळी वाऱ्याने केळीबाग उद्ध्वस्त झाली. यामध्ये बागेचे मोठे नुकसान झाल्याने खर्च सुद्धा निघणार नाही.
- सोपान महाले, केळी उत्पादक शेतकरी, दाणापूर. ता. तेल्हारा, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT