Rain Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain: वाडेगाव परिसरात वादळामुळे फळबागांसह पिकांचे नुकसान

Akola Hailstorm Update: अकोला जिल्ह्यातील वाडेगाव व नकाशी परिसरात मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यांसह गारपिटीमुळे आंबा, लिंबू आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

 गोपाल हागे

Akola News: अकोला जिल्ह्यात मंगळवारी (ता. ६) सायंकाळी काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बाळापूर तालुक्यात वाडेगाव परिसरात जोरदार वाऱ्यामुळे फळझाडांचे मोठे नुकसान झाले. आंबा, लिंबाची फळे जमिनीवर आली आहेत. गारपिटीमुळे शेती पिकांचेही नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

तालुक्यातील वाडेगाव, नकाशी परिसरात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसासह गारपीट व जोरदार वारे वाहिले. यामुळे आंबा, लिंबू जमिनीवर आले. शिवाय काही ठिकाणी मोठी झाडे मोडून पडली. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे लिंबूची झाडे उखडून पडली.

वाडेगाव येथील प्रगतिशील शेतकरी गणेश कंडारकर यांच्या शेतातील आमराईमधील काही झाडे मोडून पडली. तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. या भागात कांदा काढणी करून सुकण्यासाठी वाफ्यांमध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेला होता. अचानक आलेल्या पावसात हा कांदा भिजला. पावसाबरोबरच गारपिटीचा तडाखा कांद्याला व फळांना बसला.

मंगळवारी अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे माझ्या शेतातील आंब्याची झाडे तुटून पडली. आंबे जमिनीवर आले. यात मोठे नुकसान झाले आहे. लिंबाची झाडे उन्मळून पडल्याने बागांमध्ये जागोजागी नुकसान झाले.
गणेश कंडारकर, प्रगतिशील शेतकरी, वाडेगाव, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

Produce Quality Management: जागतिक, भारतीय मानकानुसार गुणवत्ता तपासणारी यंत्रे

Drought Management: लोकसहभागातून संकटावर मात..

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

SCROLL FOR NEXT