Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage In Khandesh : खानदेशात वादळी नुकसानीचे आकडे कमी

खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मार्च व एप्रिल महिन्यात धुमाकूळ घातला. त्यात केळी, भाजीपाला पिके, पॉलिहाऊस, शेडनेट व इतर कृषीसंबंधी बाबींची हानी झाली.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मार्च व एप्रिल महिन्यात धुमाकूळ घातला. त्यात केळी, भाजीपाला पिके, पॉलिहाऊस, शेडनेट व इतर कृषीसंबंधी बाबींची हानी झाली. पण २० ते २५ टक्केच नुकसान झाल्याचे आकडे अनेक शेतकऱ्यांबाबत प्रशासनाने तयार केले.

कमी म्हणजेच ३० टक्क्यांखाली नुकसान झाल्याचे सांगून संबंधित शेतकरी, कृषी उद्योजकांना मदत मिळत नसल्याची स्थिती आहे.

धुळ्यातील साक्री, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, जळगावमधील जळगाव, भुसावळ, जामनेर भागांत पॉलिहाऊस, शेडनेटचे नुकसान झाले आहे. तसेच रावेर, नंदुरबारमधील शहादा भागात केळीची पडझड वादळी पावसात झाली.

केळीसंबंधी विमाधारक शेतकरी काही चुकीच्या निकषांमुळे वादळासंबंधीच्या भरपाईसह उष्ण वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीस पात्र ठरणार नाहीत, केळीची पाने फाटून नुकसान झाले, पण यासंबंधी भरपाईची तरतूद निकषात नाही.

यामुळे यासंबंधी शासन किंवा प्रशासनाकडून मदत मिळणे अपेक्षित आहे. यात पॉलिहाऊस, शेडनेटचे नुकसान, टक्केवारी कशी ग्राह्य धरावी, याच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिलेल्या नाहीत.

तसेच अनेक भागात केळीचे २० ते २५ टक्के नुकसान झाल्याने संबंधितांना भरपाई मिळणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा सावळा गोंधळ प्रशासन गेले अनेक वर्षे घालत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

रावेरात केळी, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. चोपड्यात सुमारे दोन ते तीन हजार हेक्टरमध्ये आणि धुळ्यात पाच हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. पण २० ते २५ टक्के नुकसान, त्याचे आकडे भरपाईच्या अहवालात समाविष्ट केल्यास ही नुकसानीची आकडेवारी १५ हजार हेक्टरवर केळीसंबंधी जाईल, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मार्चमध्ये एकूण ६० हजार हेक्टरवरील पिकांची हानी धुळ्यात झाली. जळगावात मात्र कमी नुकसान व टक्केवारीचे निकष यात शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहत असल्याचे दिसत आहे. कारण टक्केवारीचे निकष दूर केल्यास मार्च व एप्रिलमधील नुकसान भरपाईचे आकडे जळगावातही ३० ते ३५ हजार हेक्टरपुढे जातील, असे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Shredder: ‘महाडीबीटी’वर कॉटन श्रेडरसाठी अर्ज सुरू

Avliya Avinash Success Story: विनाशकारी कोविड : अवलिया अविनाश

Choose Right Tree: कोणता वृक्ष आणि कुठे लावावा?

Biological Crop Disease Control: केवडा रोग कार्यरत होण्यास वाव, जैविक नियंत्रणावर हवा भर

Weather Stations: स्वयंचलित हवामान केंद्रांशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई : मित्तल

SCROLL FOR NEXT