Sugar Transport agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Transport : 'साखरेचे ट्रक आडवून पोत्यांवर पाणी ओता', 'स्वाभिमानी' कारखानदार संघर्ष अटळ

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत साखर आडवा हा इशारा दिला होता.

sandeep Shirguppe

Sugar Transport : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता ४०० रूपये मिळावा या मागणीसाठी कारखान्याची साखर वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांकडून साखर बाहेर सोडली जात असल्याचा प्रकार समोर आल्याने स्वाभिमानीकडून साखर वाहतूक अडवली जात आहे.

तरीही काही व्यापारी व साखर कारखानदार हे आंदोलन मोडीत काढत आहेत. जर एखादी गाडी साखर कारखान्यातून बाहेर पडली तर कार्यकर्त्यांनी गाडीचे नुकसान न करता त्या गाडीतील साखरेच्या पोत्यावर पाणी ओता जेणेकरून संपूर्ण साखर भिजून जाईल असा थेट इशारा कार्यकर्त्यांना दिला आहे. यामुळे स्वाभिमानी आणि कारखानदारांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत साखर आडवा हा इशारा दिला होता. शेतकऱ्यांना अधिकचे चारशे रुपये मिळावे ही आमची मागणी असून मागणी पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू असून, मागणी मान्य न झाल्यास साखर कोंडी करून या वर्षीचा सिझन सुरू होऊ देणार नाही असेही म्हणाले होते.

दरम्यान यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, मागच्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हफ्ता ४०० रूपये द्या ही आमची मागणी आहे. सध्या साखरेचे दर वाढले आहेत तसेच उसापासून होणाऱ्या उपपदार्थांचेही दर वाढल्याने साखर कारखानदारांना यंदा ४०० रुपये भाव देण्यास सहज शक्य आहे.

पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ४०० रूपये जादा दर देऊन हे सहज शक्य असल्याचे पहिलाच सिद्ध केले आहे. परंतु कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील अन्य कारखानदारांनी यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याने आम्ही आंदोलनाची पुढची दिशा म्हणून आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले की, उद्यापासून साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी साखर आणि त्याचे उपपदार्थ आम्ही अडवणार आहे. यामुळे माझी ट्रान्सपोर्ट कंपन्यांना विनंती आहे आमच्या कार्यकर्त्यांनी साखर आडवल्यानंतर काही झाले तर संघटना जबाबदार राहणार नाही. हे आंदोलन आम्ही उद्यापासून सुरू करणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT