Soybean Procurement  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : सोयाबीनची शासकीय खरेदी सुरू करून उत्पादकांची लूट थांबवा

Soybean Market : सोयाबीनचा शासकीय आधारभूत दर ४६०० रुपये असताना बाजारात सरसकट ३५०० ते ४३०० दरम्यान विक्री होत आहे.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीन आधारभूत किमतीपेक्षा खुप कमी दरात विक्री होत आहे. सोयाबीनचा शासकीय आधारभूत दर ४६०० रुपये असताना बाजारात सरसकट ३५०० ते ४३०० दरम्यान विक्री होत आहे.

शेतकऱ्यांची सुरू असलेली लूट थांबवावी व यासाठी तातडीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करावेत, अशी मागणी काँग्रेसने गुरुवारी (ता. १९) मुख्यमंत्र्यांकडे केली.

जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्या नेतृत्‍वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, अकोला जिल्ह्यामध्ये पावसातील खंड व येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीन उत्पादनामध्ये प्रचंड घट आली आहे. तसेच शासनाच्या मुक्त तेल आयात धोरणामुळे सोयाबीन बाजारभाव वाढायला तयार नाहीत.

यावर्षी मजुरीचे दर, बियाणे दर व कीडनाशकांच्या खर्चात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे त्वरित शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करावे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले त्यांच्यासाठी भावांतर योजना राबवून आधारभूत किंमत व त्यांना भेटलेली किंमत यातील फरक शेतकऱ्यांना देण्यात यावी.

त्वरित सर्व बाजार समित्यांमध्ये हस्तक्षेप करून आधारभूत किमतीपेक्षा कमीत विक्री थांबविण्यात यावी, शासनाने आदेशीत केलेले २५ टक्के अग्रिम विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या वेळी विनय देशमुख, महेश गणगणे, तुळशीदास बोदडे, दिनकर पाटील, विजयसिंग डाबेराव, प्रमोद पागृत, प्रदीप वखारीया, कपिल रावदेव, चंदू सावजी, अतुल अमानकर, तश्वर पटेल, नागसेन शिरसाट यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT