FPO Agrowon
ॲग्रो विशेष

‘अॅग्रोवन’ एफपीओ महापरिषद नोंदणीला राज्यभरातून प्रतिसाद

शेतकरी उत्पादक कंपन्यांची कॉर्पोरेट जगताशी व्यावसायिक सांगड घालून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘ॲग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद’ (एफपीओ लिडरशीप कॉनक्लेव्ह) नोंदणीला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः शेतकरी उत्पादक कंपन्यांची (Farmer Producer Company) कॉर्पोरेट जगताशी व्यावसायिक सांगड घालून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘ॲग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद’ (Agrowon FPO Conclave) (एफपीओ लिडरशीप कॉनक्लेव्ह) नोंदणीला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

‘सकाळ अॅग्रोवन’कडून आयोजित केल्या जात असलेल्या या एकदिवसीय महापरिषदेत राज्यातील निवडक २५० एफपीओंमधील प्रत्येकी दोन प्रतिनिधींचा सहभाग असेल. या परिषदेच्या निमित्ताने शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून कॉर्पोरेट क्षेत्राच्या असलेल्या अपेक्षा आणि संधी यावर अभ्यासपूर्ण मंथन होणार आहे. देशातील शेतकरी उत्पादक संस्था व कंपन्यांच्या वाटचालीबाबत मान्यवर वक्त्यांचे दिशादायक विचार ऐकण्याचे संधी या निमित्ताने राज्यातील कंपन्यांच्या प्रतिनिधींना मिळते आहे.

महापरिषदेत एफपीओंमधील नेतृत्वाचा विकास, व्यवसाय व बाजारपेठांमधील आव्हाने, एफपीओंसाठी असलेल्या शासकीय अनुदान योजनेवर प्रकाश टाकला जाणार आहे. त्यामुळे या महापरिषदेला उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातून नोंदणीला प्रतिसाद मिळतो आहे. नोंदणीसाठी काही भागातील संस्थांच्या आग्रहावरून आता येत्या शनिवारपर्यंत (ता. ४) मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

राज्यातील फक्त निवडक एफपीओंचा समावेश या महापरिषदेत केला जाणार आहे. निवडीकरिता विविध निकष असल्यामुळे इच्छुक एफपीओंनी आपली नोंदणी लवकरात लवकर करावी. त्यासाठी खालील लिंक क्लिक करून किंवा क्युआर कोडवर स्कॅन करून, त्यात माहिती भरावी.

जास्तीत जास्त एफपीओंनी सहभागी व्हावे ः शिंदे

शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळ गेल्या सहा वर्षांत देशात आणि राज्यात चांगली रुजली आहे. मात्र, या चळवळीतील समस्या आणि व्यावसायिक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. ॲग्रोवनच्या शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषदेत या चळवळीच्या वाटचालीवर मंथन होईल. राज्यातील जास्तीत जास्त एफपीओंनी या महापरिषदेत सहभागी व्हावे.

- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT