Maharashtra Sand Policy  Agrowon
ॲग्रो विशेष

State Sand Policy : राज्याचे वाळू धोरण आज जाहीर होणार

Maharashtra Government Sand Policy : राज्याचे वाळू धोरण २४ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : राज्याचे वाळू धोरण २४ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शनिवारी (ता. २२) एका कार्यक्रमासाठी उमरखेड येथे आले असताना ती माध्यमांशी बोलत होते.

राज्य शासनाने वाळू संदर्भात अद्यापही कोणतेही धोरण जाहीर केले नसल्याने अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे.

यासंदर्भात उमरखेड येथे महसूलमंत्री बावनकुळे यांना विचारणा केली असता त्यांनी शासनाचे वाळू धोरण २४ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असल्याचे सांगितले. २६ फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचीही माहिती माध्यमांशी बोलताना दिली.

केंद्र व राज्य शासन योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना राबवीत शनिवारी २० लाख घरकुल धारकांना पहिला हप्ता केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याहस्ते पुणे येथील कार्यक्रमात ऑनलाइन वितरित करण्यात आला.

त्याच संदर्भात उमरखेड येथे महसूलमंत्री बावनकुळे आले होते. त्यांनी पंचायत समिती प्रांगणामध्ये तालुक्यातील पहिल्या हप्त्याचे प्रमाणपत्र वितरित केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT